
मंगळवेढा टाईम्स टीम । सोलापूर येथील अॅड.स्मिता पवार यांच्या आत्महत्येसकारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत स्मिताचे पती धनंजय पवारसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. A woman lawyer has filed a case against her husband and four others in a suicide case
महिला वकिलाची गळफास घेवून आत्महत्या @SpSolapurRural pic.twitter.com/mO33jWbtR1
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) July 1, 2020
मंगळवेढा तालुक्यातील संभाजीनगर येथील उजनी वसाहतीमध्ये राहणारे विठ्ठल गोवे यांची कन्या सोलापूर जिल्हा न्यायालयात पॅक्टिस करीत होत्या. अॅड.स्मिता यांचा विवाह सोलापुरातील मुरारजी पेठ येथील जुनी पोलिस लाईन येथे राहणारा धनंजय पवार याच्याबरोबर झाला होता.
लग्नानंतर थोडे दिवस चांगले गेल्यानंतर अॅड . स्मिता यांना सासरकडील लोकांनी कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास देण्यास सुरुवात केली. स्मिता स्वतः वकील असतानाही सासरचा त्रास सहन करत होत्या.
पण या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर ३० जून २०२० रोजी सासरी जुनी पोलिसलाईन येथे राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
अशा आशयाची फिर्याद मृत स्मिता पवार यांची तालुक्यातील आई सीतादेवी विठ्ठल गोवे ( वय ५० , रा . उजनी वसाहत पाठीमागे , संभाजीनगर , ता . मंगळवेढा ) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दाखल केली.
या फिर्यादीवरून मृत स्मिता पवार हिचा पती धनंजय शिवाजी पवार ,सासू शैलजा शिवाजी पवार , नणंद सविता शिवाजी पवार , दीपाली शिवाजी पवार (सर्व रा.जुनी पोलिस लाईन, मुरारजी पेठ) अशा चौघांविरूध्द गुन्हा दाखल झाला. तपास सहा.पो.नि. वाबळे हे करत आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











