मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. दर तीन वर्षानी स्थानिक पातळी ते राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बदल होतात त्यानुसार नव्या नियुक्त्या जाहीर होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांमध्ये पक्षात अनेक नेते नाराज होते. त्यामुळे ही कार्यकारिणी कशी असेल याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. BJP’s new executive announced: Pankaja Munde has responsibility at Center, Khadse, Tawde only invited
नाजार असलेल्या पंकजा मुंडें यांना पक्षाच्या पातळीवर केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाणार आहे असं पाटील यांनी सांगितलं. तर एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं आहे.
यात १२ प्रदेश उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस,१ महामंत्री संघटन, १ कोषाध्यक्ष, १२ सचिव, ७ मोर्चांचे अध्यक्ष, कार्यकारी सदस्य ७९,
सरचिटणीस – सुजीतसिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय
उपाध्यक्ष – राम शिंदे, चित्रा वाघ, कपील पाटील, प्रसाद लाड, माधव भांडारी, सुरेश हळवणकर, प्रीतम मुंडे
मुख्य प्रतोद – आशीष शेलार प्रतोद माधुरी मिसाळ
नाराज असलेले एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज