मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
गुजराच्या अहमदाबादमध्ये एका ८ वर्षीय मुलीचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शाळेत असताना या विद्यार्थिनीच्या छातीत तीव्र वेदना झाल्या. त्यामुळे शिक्षकांनी तातडीने रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.
गुरुवारी कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातही अशीच धक्कादायक घटना घडली होती. अहमदाबादमधील एका खासगी शाळेत शिकणारी गार्गी रानपारा ही मुलगी शुक्रवारी सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे शाळेत पोहोचली होती.
पायऱ्या चढत असताना अचानक तिच्या छातीत दुखू लागले. वेदना झाल्यामुळे ती लॉबीतील बेंचवर बसली आणि काही सेकंदांत जमिनीवर पडली.
मुख्याध्यापिका शर्मिष्ठा सिन्हा यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांनी १०८ रुग्णवाहिका बोलावली, परंतु रुग्णवाहिका शाळेत पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे गार्गीला कर्मचाऱ्यांच्या गाडीतून नेले.
मात्र रुग्णालयात जाईपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण सांगितले.
शिक्षिकेला वही दाखवायला जाताना तिसरी वर्गातील तेजस्विनी कोसळली
कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात गुरुवारी असाच एक प्रकार घडला. येथील सेंट फ्रान्सिस शाळेतील ८ वर्षांची तेजस्विनी वर्गात शिक्षकांना वही दाखवण्यासाठी बेंचवरून उठली, मात्र जागेवरच बेशुद्ध झाली.
तेजस्विनीने भिंतीचाही आधार घेतला, मात्र ती जमिनीवर कोसळली. शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिच्या मृत्यूचेही प्राथमिक कारण हृदविकाराचा झटकाच असल्याच डॉक्टरांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज