मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज रविवारी 12 नव्या रुग्णांची भर पडली असून आता कोरोनाचा संसर्ग सर्वच तालुक्यात वाढू लागला आहे. रविवारी घोडा तांडा येथील एका 64 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आता रुग्णांची संख्या 532 झाली आहे. आज 24 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून अद्याप 288 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
रविवारी उत्तर सोलापुरातील मार्डी, नान्नज, बेलाटी येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर दक्षिण सोलापुरातील नवी विडी घरकूल, हत्तूर, मुळेगाव, बोरामणी येथेही प्रत्येकी एका रुग्णांची भर पडली आहे. तसेच अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडीत एक, तर बार्शीतील कसबा पेठ, सुखदेव नगर, बारंगुळे प्लॉट, उपळाई रोड येथे प्रत्येकी एक रुग्ण नव्याने आढळला आहे.
तालुकानिहाय उपचार घेत असलेले रुग्ण
अक्कलकोट (60), दक्षिण सोलापूर (88), बार्शी (66), करमाळा व माढा प्रत्येकी (4), माळशिरस, मंगळवेढा, सांगोला प्रत्येकी (1), मोहोळ (13), उत्तर सोलापूर (32) आणि पंढरपूर (18) अशाप्रकारे एकूण 288 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Solapur rural corona virus update
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज