टीम मंगळवेढा टाईम्स ।
चांदी अथवा चांदीचे दागिने खरेदी-विक्री करण्यासाठी नियम बनविण्याची तयारी सरकारने चालविली आहे. आतापर्यंत केवळ सोन्याच्या खरेदीसाठीच असे नियम लागू होते.
हॉल मार्किंग नियमांसंबंधीची प्रक्रियाही सरकारने सुरू केली आहे. तांत्रिक समस्यांमुळे यात अडचणी येत आहेत. यातील मुख्य समस्या चांदीवर ‘एचयूआयडी’ लिहिण्याची आहे. चांदीचीवरील ‘एचयूआयडी’ सहजपणे बुजून जाते. त्यासाठी काय तंत्रज्ञान वापरावे, यावर विचार केला जात आहे.
का आवश्यक आहे ‘एचयूआयडी’?
■ ‘एचयूआयडी’मुळे दागिन्यांच्या शुद्धतेची हमी मिळते. दागिन्यावर नमूद केलेल्या शुद्धतेचेच (२२ कॅरेट अथवा १८ कॅरेट) दागिने ग्राहकांना मिळतात. ‘एचयूआयडी मध्ये शुद्धते- सोबतच दागिन्याची इतरही सर्व माहिती उपलब्ध असते.
■ वजन, निर्माता आणि विक्रीचे स्थान यांचा त्यात समावेश आहे. ‘एचयूआ- यडी’मुळे सरकारसाठी आभूषण व्यव- सायावर नजर ठेवणे सोपे होते. १६ जून २०२१ पासून भारतात सोन्यासाठी हॉलमार्किंग बंधनकारक आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज