mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला दणका, गृहमंत्र्यांनी केलेल्या पोलिसांच्या बदल्या ४ दिवसातच रद्द

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला दणका, गृहमंत्र्यांनी केलेल्या पोलिसांच्या बदल्या ४ दिवसातच रद्द

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । महाविकासआघाडीमधील असमन्वय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ४ दिवसात रद्द करण्याचा अजब कारभार महाविकासआघाडीने करून दाखवलाय. २ जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या. मात्र ४ दिवसातच मुख्यमंत्र्यांनी या बदल्या रद्द केल्या आहेत. यामुळे सरकारमधील मतभेद आणि समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आलाय.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २ जुलै रोजी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. यात परमजित दहिया, प्रशांत कदम, गणेश शिंदे, डॉ. रश्मी करंदीकर, शहाजी उमप, डॉ. मोहन दहिकर, विशाल ठाकूर, संग्रामसिंह निशाणदार, प्रणय अशोक आणि नंदकुमार ठाकूर यांचा समावेश होता.  

बदल्या झालेल्या जवळपास सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या बदलीच्या ठिकाणी पदभार स्वीकारून कामही सुरू केलं होतं. मात्र अवघ्या ४ दिवसात या सर्व पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या. बदल्या रद्द करताना या अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या पूर्वीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आलेत. विशेष म्हणजे रविवार असूनही या बदल्यांचे आदेश काढण्यात आलेत.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मुख्यमंत्र्यांनी रविवारी रद्द केले. यामुळे सरकारमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आलाय. गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता या बदल्या केल्या होत्या का? गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही, त्यामुळे त्यांनी बदल्या रद्द केल्या का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला हा दणका दिल्याचं मानलं जातंय.  सरकारमधील हा गोंधळ समोर आल्यानंतर सहाजिकच विरोधक टीका करण्याची संधी सोडणार नाहीत.

शासकीय सेवेतील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत. मात्र आयपीएस म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या अद्याप झालेल्या नाहीत. त्यामुळे पोलीस दलात संभ्रमाचं वातावरण आहे. अशातच ४ दिवसात बदल्यांचे आदेश रद्द केल्याने सरकारप्रमाणे पोलीस दलातही गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

यापूर्वी कोरोनाच्या कारणामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक महापालिका आयुक्तांच्या बदल्या शासनाने एकाच वेळी करून गोंधळ घातला होता. त्यातच नवी मुंबई महापालिका आयुक्तांची बदलीही रद्द करण्यात आली होती. आता या बदल्यांबाबतचा आणखी एक गोंधळ समोर आलाय. महाविकास आघाडी सरकारचे तीन पक्षांचे सरकार चालवताना सरकारमधील हा गोंधळ वारंवार समोर येतोय. हा गोंधळ वाढत गेला तर या सरकारचं काय होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

Chief Minister hits NCP, police transfers made by Home Minister canceled in 4 days

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
कोरोना बनला सोलापूरकरांचा काळ! रविवारचा आकडा 106; चौघांचा बळी

कोरोना बनला सोलापूरकरांचा काळ! रविवारचा आकडा 106; चौघांचा बळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात सुन्न करणारी घटना! ११ वर्षांच्या चिमुरडीने शेतात जाऊन संपवलं जीवन; कारण…

July 18, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

दसरा-दिवाळी दरम्यान ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार ‘या’ तारखेची मतदार यादी

July 18, 2026
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा