टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे कामगारांची नवीन नोंदणी करण्यासाठी ठेकेदारांच्या तालुकानिहाय बैठका घेऊन त्यांच्याकडून कामगारांची संख्या व माहिती घ्यावी.
कामगारांना ठेकेदाराने ९० दिवसांत ते काम करीत असल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. माहिती न देणाऱ्या ठेकेदाराविरोधात सामाजिक सुरक्षा कायदा २००८ नुसार कठोर कारवाई होईल, असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच असंघटित कामगारांच्या नोंदणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली.
श्री. आशीर्वाद म्हणाले, आयुष्यमान भारत कार्ड, पोर्टेबल रेशन कार्ड, पीएम जीवन ज्योती बीम योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आदी योजनांचा कामगार लाभ घेत आहेत का याची माहिती घ्या. नसेल तर नोंदणी करा.
३७६२ कामगारांची नोंदणी
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग, महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा योजना, जिल्हा परिषद, महापालिका, सार्वजनिक बांधकाम, नगरपालिका या सर्व यंत्रणांकडे जवळपास १२०० ठेकेदारांची नोंद आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कामगारांची संख्या ३७६२ आहे.
मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांची संख्या नगण्य असून सर्व यंत्रणांनी गतीने नोंदणी करणे गरजेचे असल्याचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज