टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे.
वाढदिवसाचे औचित्य साधून अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी पोहोचले आहेत. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल उपस्थित आहेत.
खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात पुरस्कार व सन्मान सोहळ्याचे आयोजन
माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा येथे आज 84 उत्कृष्ट विद्यार्थी महिला जेष्ठ नागरिक व पत्रकारांचा पुरस्कार आयोजित करण्यात आल्याची माहिती मंगळवेढा तालुका शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा येथील जवाहरलाल शेतकी हायस्कूल येथे आज सकाळी ठीक 11 वाजता पुरस्कार व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार शरद पवार यांच्या 84 व्या वाढदिवसाच्या उचित्य साधून 84 उत्कृष्ट विद्यार्थी, 84 विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला, 84 जेष्ठ नागरिक व तसेच मंगळवेढा तालुक्यातील पत्रकारांचा पुरस्कार व सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, भैरवनाथ शुगर उद्योग समूहचे उपाध्यक्ष अनिल सावंत हे असणार आहेत.
माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे व तसेच राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राहुल शहा यांच्या शुभहस्ते सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकास्तरीय व तसेच ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय मंगळवेढा तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांनी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज