टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांवर चार वर्षांपासून प्रशासक असून, सोलापूर महापालिकेवर पावणेतीन वर्षांपासून प्रशासक आहेत. जानेवारी २०२५ मध्ये या संस्थांच्या निवडणुका प्रस्तावित असून, डिसेंबरअखेर वॉर्ड रचनेचा आराखडा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रशासनातील अधिकारी देत आहेत.
यासोबत जिल्हा परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला नगरपालिका तसेच महापालिका निवडणुका होतील. त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लागेल असे ‘लोकमत’ने आज वृत्त प्रसिद्ध केले आहे.
बार्शी, पंढरपूर, करमाळा, सांगोला, अक्कलकोट, मंगळवेढा, मैंदर्गी, दुधनी, कुडूवाडी, मोहोळ, अकलूज या नगरपालिकांवर डिसेंबर २०२१ पासून प्रशासक आहे, तर सोलापूर महापालिकेवर ७ मार्च २०२२ पासून प्रशासक आहे. म्हणजे पावणेतीन वर्षांपासून महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. वॉर्ड रचनेनंतर आरक्षण कार्यक्रमही जाहीर होईल.
नगरपालिका आणि महापालिकेतील काही सदस्य जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून जातात. या संस्थांच्या निवडणुका न झाल्याने जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच महापालिकेच्या ३० जागा रिक्त आहेत. या निवडणुका झाल्यानंतर डीपीसीवर नवीन ३० सदस्यांची नियुक्ती होईल.
तसेच जिल्ह्यातील ५० हून अधिक ग्रामपंचायतींची सार्वजनिक, तर काही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका प्रस्तावित आहेत. डिसेंबर अखेर या ग्रामपंचायतींची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
किती सदस्यांचा असेल वॉर्ड
वॉर्ड रचनेसंदर्भात यापूर्वी दोन आदेश निघाले आहेत. सुरुवातीला तीन सदस्यांचा वॉर्ड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यात बदल करत चार सदस्यांचा वॉर्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आदेशही निघाला. आता यात बदल होण्याची चर्चा आहे. त्यामुळे किती सदस्यांचा वॉर्ड होईल, या संदर्भात सर्वांनाच उत्सुकता आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज