टीम मंगळवेढा टाईम्स ।
देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. महायुतीला महाराष्ट्रात प्रचंड बहुमत मिळाल्याने फडणवीस यांच्या नेतृत्वावर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
राज्यात भाजपच्या वतीने जास्तीत जास्त आंदोलन करणारे आणि आपल्या रणनीतीमुळे भाजपला मोठे यश मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. पण महाराष्ट्रातील सरकार चालवणे हे मोठे आव्हान असते.
भाजपच्या नेतृत्वात महायुतीने या निवडणुकीत जनतेला मोठे आश्वासनं दिली होती. त्यामुळे लोकांच्या अपेक्षांचा डोंगर खूप मोठा झाला आहे. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्यांना देखील सोबत घेऊन चालावे लागणार आहे. मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस यांना काही आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणे
विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. ज्याला संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. सरकारने जर पुन्हा महायुतीचे सरकार आले तर लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरुन २१०० करण्याचे आश्वासने दिले होते. आता हे आश्वासन पूर्ण करण्याचे पहिले प्राधान्य हे असेल जेणेकरून आर्थिक स्थिती स्थिर होईल.
याशिवास सरकारने किसान सन्मान निधीची रक्कम 12 हजारांवरून 15 हजार करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वृद्धापकाळ निवृत्ती वेतनात वाढ करण्याचं आश्वासन देखील सरकारने दिले होते. राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करणे हे मोठे आव्हान असणार आहे. राज्यावर ७.८२ लाख कोटीचे कर्ज आहे. ते देखील कमी करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. महसुली वाढ जशी होती तशीच आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत कर्मचाऱ्यांना पगार देणे कठीण होऊ शकते. असे तज्ज्ञांचे मत आहे.
मराठा समाजाला आरक्षण देणे
देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्रीची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासमोर मराठा आरक्षणाचा मोठा विषय असणार आहे. कशावर कोणत्या पद्धतीने आरक्षण देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र वाशियांचे लक्ष लागले आहे
महायुतीत सत्तेचं वाटप
भाजपने ही निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत लढवली आहे. त्यामुळे तिन्ही पक्ष मिळून राज्यात सत्ता स्थापन झालीय. त्यामुळे तिन्ही पक्षांना सोबत घेऊन काम करण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे असणार आहे. राजकीय सहकाऱ्यांशी चर्चा करुन सगळे निर्णय घ्यावे लागणार आहेत. महायुतीत भाजपकडे सर्वाधिक जागा असल्याने मुख्यमंत्रीपदी भाजपचा मुख्यमंत्री निवडण्यात आला.
पण इतर दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन राज्याचा गाडा चालवावा लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील.
महाराष्ट्राला नंबर १ ठेवणे
विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार आल्यानंतर आता सर्वात मोठं आव्हान असेल ते महाराष्ट्रात जास्तीत जास्त उद्योग आणावे आणि जे आहेत त्यांना इतर राज्यात जाण्यापासून रोखणे. कारण महायुती सरकारवर उद्योग बाहेर जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप होता.
महाराष्ट्राचे दोन मोठे प्रकल्प गुजरातला गेले होते. वेदांतने आपला चिप कारखाना प्रकल्प जो १.५३ लाख कोटी रुपयांचा आहे, तो गुजरातला नेला होता. तर टाटा-एअरबस सी-२९५ वाहतूक विमान प्रकल्पही गुजरातला गेल्याने महाराष्ट्र सरकारवर टीका झाली होती. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना गुंतवणुकीत राज्याला नंबर एक ठेवण्याचं आव्हान असेल.
मुंबई महापालिका निवडणूक
मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकण्यांचं मोठं आव्हान देखील देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे असेल. मुंबई महापालिका जिंकणे हे कोणत्याही राज्याच्या विधानसभा निवडणुका जिंकण्याइतकेच महत्त्वाचे मानले जाते. एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत त्यांना मुख्यमंत्री ठेवण्याची मागणी केली होती.
पण भाजपला ते मान्य नव्हते. यामुळे चुकीचा मेसेज जाईल असं भाजपने सांगितले. बीएमसीवर ३० वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. आता शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर भाजपला मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा पराभव करण्याचं आव्हान महायुतीपुढे असेल. सरकारवर आपली पकड मजबूत करण्यासाठी फडणवीसांना कोणत्याही परिस्थिती मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकावी लागेल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज