टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यातील नव्या सरकारच्या शपथविधीचा सस्पेन्स संपलायं. उद्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच शपथ घेणार असल्याचं निश्चित झालंय तर एकनाथ शिंदे नाही पण अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं कन्फर्म ठरलं असल्याचं चित्र दिसून येत आहे.
शिंदे-फडणवीसांच्या पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी शिंदेंचं संध्याकाळपर्यंत ठरेल पण मी तर उद्या शपथविधी घेणार असल्याचं ठामपणे सांगितलंय.
त्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार शपथविधी घेणार असल्याचं स्पष्ट झालयं. मात्र, एकनाथ शिंदे यांच्याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी आम्ही सत्तास्थापनेचा दावा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केला असल्याचं सांगितलंय. यावेळी आम्ही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं अशी शिफारस केली असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.
त्यानंतर तुम्ही उद्या शपथ घेणार का? असा सवाल माध्यमांकडून विचारण्यात आल्यानंतर त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, संध्याकाळपर्यंत माझ्या शपथविधीबाबत सांगणार आहे.
एकनाथ शिंदे शपथविधईबाबत बोलत असतानाच अजित पवार यांनी मिश्किलपणे भाष्य करीत एकनाथ शिंदे संध्याकाळी निर्णय सांगतील पण मी तर उद्या शपथविधी घेणार असल्याचं अजितदादांनी मिश्किलपणे सांगितलंय. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
अजितदादांच्या या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंनीही मिश्किलपणे टिप्पणी केलीयं. शिंदे म्हणाले, अजित पवार यांना संध्याकाळी आणि सकाळच्या शपथविधीचा चांगला अनुभव आहे. शिंदेंनी असं म्हणताच महायुतीचे तिन्ही नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिंदेसह उपस्थित सर्वच नेत्यांमध्ये एकच हशा पिकल्याचं दिसून आलं.
दरम्यान, उद्या महायुती सरकार राज्यात स्थापन होणार असून मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तर भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली असून आता मुख्यमंत्रिपदीही देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार हे शपथविधी घेणार असून एकनाथ शिंदे यांच्याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज