टीम मंगळवेढा टाईम्स ।
देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल कृषी मिशन अंतर्गत डिजिटल ओळख देण्यासाठी केंद्र सरकारने फार्मर आयडी तयार करण्याची योजना आखली आहे.
याद्वारे ११ कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्यात येणार आहे. या एकाच कार्डद्वारे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड पीकविक्रीसारख्या आणि सुविधांचा लाभ घेता येईल.
कृषी शेतकरी कल्याण मंत्रालयाने २८ नोव्हेंबर रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून व शेतकरी ओळखपत्र तयार करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित निर्देश दिले आहेत. वित्तीय वर्ष २०२४-२५ मध्ये ६ कोटी, २०२५-२६ मध्ये ३ कोटी, तर २०२६-२७ मध्ये २ कोटी शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट हे करण्यात येईल.
ओळखपत्र आधारशी लिंक केलेले असेल, जे शेतकऱ्यांच्या जमीन नोंदींशी जोडले जाईल. या कार्डमध्ये शेतकऱ्यांच्या वैयक्तिक माहितीबरोबरच पेरणी केलेल्या पिकांची माहिती आणि जमिनीचा तपशील नोंदवला आहे. या कार्डमुळे शेतकऱ्यांना हमीभाव योजनांसाठी अर्ज करताना आवश्यक असलेल्या तपासण्या सुलभ होतील.
शेतकरी आयडीवरून तयार करणार शेतकरी रजिस्ट्री
कृषी मंत्रालय शेतकरी आयडी कार्डच्या मदतीने शेतकरी नोंदणी तयार करणार आहे, जे केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी मिशनच्या अंतर्गत ‘अॅग्री स्टॅक’चा भाग होईल.
यासाठी यावर्षीच्या सुरुवातीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी होती. या योजनेसह शेतकऱ्यांना त्यांच्या डिजिटल ओळखीचा वेगाने लाभ मिळेल आणि कृषी क्षेत्रातील डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये मजबुती येईल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज