मंगळवेढा टाईम्स टीम । मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात बाहेरून येणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत चालले आहे. काही लोक स्वतःहून काॅरंटाईन होत आहेत.पण काही लोक किंवा त्यांचे नातेवाईक गावातील ग्रामस्तरीय समित्यांशी हुज्जत घालत आहेत. यामुळेच मंगळवेढा तालुक्यात कोरोना येण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी मंगळवेढा तालुक्यातील ग्रामस्थांमधून होत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी गावात चार दिवस वास्तव्य करून गेलेला जावई कोरूना पॉझिटिव्ह निघाल्याने निंबोणी गावासह मंगळवेढा तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याआधीही हुन्नूर गावात अशाच प्रकारे वास्तव्य करून गेलेला जावई कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. पण हुन्नूर येथील ‘त्या’ जावयाच्या संपर्कात आलेल्या सर्व जणांचे रिपोर्ट टनिगेटिव्ह आल्याने मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला होता. पण पुन्हा एकदा निंबोणी गावात येऊन गेलेल्या जावयामुळे मंगळवेढा तालुक्यातील जनता वेंटीलेटरवर असल्याची चर्चा होत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी गावात पाहुणा म्हणून येउन गेलेला जावई कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सांगोला तालुक्यातील कोळा येथील राहणारा व पुणे येथे पोलीस दलात असणारा एक व्यक्ती हा निंबोणी येथे आपल्या सासरवाडीत आला होता. सदरील व्यक्ती सासरवाडीत येऊन ४ ते ५ दिवस राहुन कोळा येथे परत गेला असता त्यास श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यानं उपचारासाठी त्यास तातडीनं मिरज येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आलं होतं.
रुग्णालयात उपचार सुरू असतांना सदरील व्यक्तीचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा आज अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्ती व इतर नातेवाईकांना मंगळवेढा येथे संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आले असून इतर लोकांचा शोध घेणं सुरू आहे.
होते.माचणूर येथील दोघे भाऊ पॉझिटिव्ह आजोबाच्या संपर्कात आल्याने त्या दोघांनाही मंगळवेढा येथे इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. ते दोघे मोहोळ तालुक्यातील गावी आजोळी गेले होते.वरील 9 जणांचे सोमवारी दुपारी स्वॅब घेण्यात आले असून पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हा एकमेव तालुका आहे ज्या तालुक्यामध्ये अद्यापपर्यंत एकच रुग्ण सापडला आहे. जो पाटकळ गावात सापडला आहे. पण तो पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरक्षा कर्मचारी असल्याने सदर व्यक्तीचा पाटकळ गावाशी किंचितच संबंध येतो. पाठकळ येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ‘त्या’ व्यक्तीपासून पाटकळ तसेच मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावातील व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होणे शक्य नाही.
After staying in solapur mangalwedha Nimboni village, for four days, son-in-law Corona is positive
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज