टीम मंगळवेढा टाईम्स।
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार उतरविल्याने अगोदरच अडचणीत असलेले भगीरथ भालके यांना पंढरपुरात धक्का बसला आहे. पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा उज्वला भालेराव आणि त्यांच्या समर्थक माजी नगरसेवकांनीही भालके यांची साथ सोडली आहे.
तत्पूर्वी मंगळवेढ्यातील समविचारी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानेही भाजप आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा देण्याबाबत सूतोवाच केलेले आहे, त्यामुळे भालकेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
भगीरथ भालके हे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर पंढरपुरात विधानसभेची निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचे आव्हान असतानाच
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना एबी फार्म देऊन विधानसभेच्या मैदानात उतरविले आहे, त्यामुळे भाजपच्या विरोधात लढताना भालके यांना मित्रपक्षाची साथ असणार नाही, हे स्पष्ट आहे.
एकीकडे महाविकास आघाडीतच बिघाडी झालेली असतानापंढरपुरातील काही सहकारीही पक्ष सोडून जात असल्याचे स्पष्ट होत आहे. पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा उज्वला भालेराव आणि त्यांचे समर्थक माजी नगरसेवक महादेव धोत्रे, ऋषीकेश भालेराव यांनी भालकेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी नगराध्यक्षा उज्वला भालेराव, माजी नगरसेवक महादेव धोत्रे, ऋषीकेश भालेराव यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भालेराव अणि धोत्रे यांनी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना आपला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातील समविचारी आघाडीनेही गुरुवारी आमदार समाधान आवताडेंना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अजित जगताप यांनी तसे विधान केले आहे. समविचारी आघाडीतील नेत्यांची एक बैठक झाली,
त्यात भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या पाठीशी जाण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे. समविचारी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते येत्या दोन दिवसांत मेळावा घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत.
मंगळवेढ्यानंतर काल भगीरथ भालके यांना पंढरपुरात धक्का बसला आहे. भालकेंची साथ सोडली, त्यानंतर आज पंढरपुरातील भालकेंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज