टीम मंगळवेढा टाईम्स ।
यूपीआय लाईटच्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आज 1 नोव्हेंबर 2024 पासून युपीआय लाईट प्लॅटफॉर्ममध्ये दोन महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. पहिला आणि महत्त्वाचा बदल म्हणजे आता यूपीआय लाईटच्या वापरकर्त्यांना पहिल्यापेक्षा जास्त पेमेंट करता येणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयकडून ट्रांजेक्शनची लिमिट वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता युजर्सची पेमेंटची मर्यादा वाढणार आहे.
दुसऱ्या बदलाबाबत बोलायचे झाल्यास एक नोव्हेंबरपासून जर तुमच्या UPI Lite चं बॅलन्स एका निश्चित मर्यादेपेक्षा कमी झाल्यास ऑटो टॉपच्या माध्यमातून तुमच्या खात्यातून त्यामध्ये पैसे अॅड होणार आहे, म्हणजे आता तुम्हाला मॅनुअली पैसे अॅड करण्याची गरज नाही.
हे नवे फिचर कधीपासून सुरू होणार?
UPI Lite ऑटो-टॉप-अप फिचर आजपासून म्हणजे एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. UPI Lite हे एक प्रकारचे वॉलेट आहे, जो यूजर्सशिवाय युपीआय पीनचा वापर करून छोट्या-मोठ्या ट्रांजेक्शनची सुविधान उपलब्ध करून देते.
सध्या तुम्हाल जर युपीआय लाईटमधून पैशांचा व्यवाहार करायचा असेल तर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून युपीआय लाईटमध्ये पैसे जमा करावे लागतात.
मात्र आता एक नोव्हेंबरपासून एका ठरावीक मर्यादेपर्यंत युपीआय लाईटमध्ये तुमच्या बँक खात्यातून डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला पैसे जमा करण्याची आवश्यकता नसणार आहे.
एका निश्चित मर्यादेपेक्षा तुमच्या युपीआय लाईटचं बॅलन्स कमी झालं की तुमच्या खात्यामधून आपोआप तेवढे पैसे तुमच्या युपीआय लाईटमध्ये जमा होणार आहेत.
लिमिटमध्ये वाढ
UPI Lite द्वारे प्रत्येक युजरला पाचशे रुपयांपर्यंत व्यवहार करण्याची सुविधा मिळते. तर युपीआय लाईटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम ठेवू शकता. मात्र आता आरबीआयकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
युपीआय लाईटच्या ट्रांजेक्शनची मर्यादा वाढवण्यात आली असून, ती पाचशेवरून हजार करण्यात आली आहे. तसेच तुम्हाला आता तुमच्या युपीआय लाईटमध्ये दोन हजारांऐवजी चार हजारांपर्यंत रक्कम ठेवता येणार आहे.
SBI क्रेडिट कार्डमध्ये बदल
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI 1 नोव्हेंबरपासून आपल्या क्रेडिट कार्डमध्ये नवीन बदल करणार आहे. वास्तविक, 1 नोव्हेंबरपासून, असुरक्षित SBI क्रेडिट कार्ड्सवरील वित्त शुल्क 3.75 टक्के असेल. त्याच वेळी, युटिलिटी सेवांमध्ये 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरल्यास 1 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
म्युच्युअल फंड नियमांमध्ये बदल
बाजार नियामक सेबी म्युच्युअल फंडातील इनसाइडर ट्रेडिंगचे नियम कडक करणार आहे. खरं तर, आता मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांच्या निधीमध्ये नामांकित व्यक्ती आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी केलेल्या 15 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांची माहिती अनुपालन अधिकाऱ्याला द्यावी लागेल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज