टीम मंगळवेढा टाईम्स ।
हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव आणि सण म्हणजे दिवाळी…प्रकाशाचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरसपासून दिवाळीला सुरुवात होते.
मग नरक चतुर्दशी म्हणजे दिवाळीचा पहिली आंघोळ केली जाते. या सणाला छोटी दिवाळी असंही म्हणतात. यंदा दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झालाय. काही लोक म्हणतात दिवाळी आज 31 ऑक्टोबर तर काही जण उद्या 1 नोव्हेंबरला आहे.
यामागे सर्व घोळ हा दोन दिवस प्रदोष काळात अमावस्या तिथी आल्यामुळे झाला आहे. अशात महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन कधी करायचं याबद्दलचा गोंधळ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दूर केलाय.
दिवाळी कधी आहे?
आश्विनी महिन्यातील अमावस्या तिथीला दिवाळीचा सण साजरा करण्यात येतो. पंचांगानुसार अमावस्या तिथी आज 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजून 12 मिनिटापासून उद्या 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजून 53 मिनिटापर्यंत असणार आहे.
त्यासोबत प्रदोष काळ आणि वृषभ काळ हे दोन शुभ काळ दिवाळीत पूजेसाठी महत्वाचे आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार प्रदोष आणि वृषभ काळात दिवाळी पूजा किंवा लक्ष्मी पूजा करणे खूप शुभ मानले जाते.
दोन दिवस प्रदोषकाळी आश्विन अमावास्या कमी-अधिक प्रमाणात असली तरी लक्ष्मी-कुबेरपूजन दुसऱ्या दिवशी प्रदोषकालात करावे असे धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथिनिर्णय, व्रतपर्व विवेक इत्यादी अनेक धर्मशास्त्रीय ग्रंथात दिलं आहे.
काही ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात जर तुम्हाला अमावस्या तिथीमध्येच शुक्रवार 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन करायचं असेल तर 5 वाजून 53 मिनिटापर्यंतच करावं लागणार आहे.
1962, 1963 आणि 2013 मध्येही दोन दिवस प्रदोषकालात आश्विन अमावास्या आली होती. त्यावेळीही दुसऱ्या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केलं होतं असं पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी सांगितलंय.
लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त अमावस्या काळात – संध्याकाळी 5:36 ते 6:15 पर्यंत
प्रदोष काळात लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त – संध्याकाळी 5:35 ते रात्री 08.06 पर्यंत
भारतात कुठल्या शहरात कधी दिवाळी ?
खरं तर उत्तर भारतीय 31 ऑक्टोबर तर महाराष्ट्रातील मराठी लोक 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करणार आहेत. दिल्ली आणि मुंबईत 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. उत्तराखंडमध्ये 1 नोव्हेंबरला, हरियाणा, बिहार आणि उत्तर भारतात 31 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे.
लक्ष्मीपूजन विधी
लक्ष्मीपूजन विधी करण्याकरिता सर्वप्रथम देवघरामध्ये एक चौरंग ठेवावा त्यावर लाल कापड अंथरून घ्यावा. त्यावर उजव्या बाजूला कळस मांडावा त्या कळसांमध्ये पाच विड्याची पाने टाकावी, एक रुपयाची नाणी टाकावे आणि कळसाच्या वर नारळ ठेवावा त्या नारळाची शेंडी वर असली पाहिजे.
आपण जो चौरंग घेतला आहे, त्या चौरंग वर मध्यभागी तांदुळाची रास करावी. त्यावर गणपती, कुबेर, लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर सुपारी ठेऊ शकतात. त्यानंतर चौरंगावर जागा शिल्लक असेल त्या जागेमध्ये हिशोबाची वही आणि पेन ठेवावी तसंच पैसे नाणी ठेवावे. त्यानंतर चौरंगाची हळद कुंकू लावून पूजा करून घ्यावी. फराळ आणि लाह्या बताशे यांचा नैवेद्य दाखवावा. झाडूला लक्ष्मी मानतात म्हणून नवीन झाडूची पूजा केली जाते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज