टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागली असताना पुणे पोलिसांना एक मोठं घबाड सापडलं आहे. काल पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
ही गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत ही गाडी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप केला आहे. आता या आरोपावर शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यात खेड-शिवापूर परिसरातून जप्त करण्यात ५ कोटींच्या रक्कमेवरुन सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याप्रकरणावरुन शिवसेना खासदार संजय राऊतांनी चांगलाच निशाणा साधला आहे.
ज्या गाडीत ही रक्कम सापडली ती गाडी मिंधे टोळीतील एका आमदाराची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काय बापू.. किती हे खोके? असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता यावरुन शहाजीबापू पाटील यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, सध्या ही गाडी मंगळवेढा तालुक्यातील एका माजी सरपंचाचने ही गाडी खरेदी केले असल्याचे बोलले जात असुन स्वतः अमोल नलावडे या व्यक्तीने ही गाडी त्यांना विकल्याचे सांगितले आहे.
शहाजीबापू पाटील काय म्हणाले?
“मी रोकड जप्त झाल्याची बातमी टीव्हीला पाहिली. माझं यात कुठेही नाव आलेलं नाही. या गाडीशी माझा कोणताही संबंध नाही. त्या तालुक्यात माझे हजारो कार्यकर्ते आहेत. पण ती गाडी कोणाची याबद्दल मला काहीही कल्पना नाही. मी काल दिवसभर खेड्या-पाड्यात फिरत लोकांशी संपर्क साधत होतो. रात्री १० वाजता मला ही बातमी टीव्हीवर दिसली”, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
“अमोल नलावडे हा शेकापचा कार्यकर्ता”
“अमोल नलावडे हा शेकापचा कार्यकर्ता आहे. त्याचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी होते. गेल्या दोन वर्षांपासून तो माझ्यासोबत शिवसेनेचे काम करत आहे. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. त्यात नेमकं काय हे मला माहिती नाही”, असेही शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.
“माझा कोणताही संबंध नाही”
“संजय राऊतांची सत्ता गेल्यापासून त्यांना झोपताना झाडं आणि उठताना डोंगर दिसत आहेत. याप्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही.
सांगोला म्हटल्यानंतर त्यांचा डोळ्यासमोर फक्त माझा चेहरा दिसतो. मला याबद्दल कोणतीही माहिती नाही. मी थोड्या वेळाने नेमकं प्रकरण काय याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे”, असे त्यांनी म्हटले.
संजय राऊत काय म्हणाले?
या प्रकरणानंतर संजय राऊतांनी ट्वीट करत शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर आरोप केला होता. “मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले. १५ कोटी चा हा पहिला हप्ता! काय बापू.. किती हे खोके?” असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज