समाधान फुगारे । मंगळवेढयात गुरुवारी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली असून तो परिसर कंटेनमेंट झोन जाहीर झाला असून उद्यापासून पुढील आदेश येईपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
मंगळवेढा शहरातील एका व्यक्तीचा आज दि.9 जुलै रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून सदर व्यक्ती मौजे मंगळवेढा ता. मंगळवेढा येथील स्थानिक रहीवासी असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
त्याचेवर मंगळवेढा येथील एका दावाखान्यात उपचार दि.6 जुलै पुर्वी चालु होते. उपचार दरम्यान त्यास त्रास जाणवु लागल्याने दि.6 जुलै रोजी सोलापुर येथील शासकीय रुग्णालयात त्यास पाठविणेत आले होते. तेव्हापासुन आज पर्यंत सदर व्यक्ती सोलापूर मध्ये आहे.
सोलापूर येथे त्यांची कोरोना चाचणी घेणेत आली असुन त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. सदर व्यक्तीचे संपर्कात आलेले high risk contacts व low risk contacts शोधणेचे कामकाज चालु करणेत आलेले आहे.
संपुर्ण मंगळवेढा शहर व परीसर प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करणेबाबत कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज