mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढेकरांसाठी सुवर्ण दिन! आ.आवताडेंच्या प्रयत्नांतुन 24 गाव उपसा सिंचन योजनेचे काम आजपासून सुरू; देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते आज 1100 कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 7, 2024
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
मंगळवेढेकरांसाठी सुवर्ण दिन! आ.आवताडेंच्या प्रयत्नांतुन 24 गाव उपसा सिंचन योजनेचे काम आजपासून सुरू; देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते आज 1100 कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या सुमारे ७०० कोटींच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ आज दि.7 ऑक्टोबरला दुपारी 1.30 वाजता मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव-दहिवडी रस्त्यावरील लक्ष्मीदेवी टेकावर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील उद्योग मंत्री उदय सामंत जलसंधारण मंत्री संजय राठोड सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत

तरी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात कळीचा व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा ठरलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला 13 मार्च 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळाली होती मात्र या मंजुरीनंतर या अगोदर दोन वेळा मंजुरी मिळाली आहे.

हे केवळ राजकारणासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मंजुरी देऊन लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे अशा टीका विरोधकांनी केल्या होत्या.

मात्र मंजुरीच्या दुसऱ्याच दिवशी टेंडर पब्लिश करत सरकारने विरोधकांना चपराक दिली होती त्यामुळे काही दिवसातच या योजनेचे काम सुरू होईल असा विश्वास दुष्काळी भागातील जनतेला वाटू लागला होता तो दिवस उजाडला असून प्रत्यक्षात या योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे.

पोट निवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून समाधान आवताडे यांना निवडून द्या महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून मी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी देतो असा शब्द

तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील सभेत मंगळवेढेकरांना दिला होता त्या शब्दावर विश्वास ठेवून मंगळवेढेकरांनी समाधान आवताडे यांना आमदार केले त्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी सरकारचा करेक्ट कार्यक्रम ही केला

आणि अवताडे यांच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पाठपुराव्याची दखल घेत बुधवार १३ मार्च २०२४ च्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६९७.५१ कोटीच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस विना अट मंजुरी देत मंगळवेढेकरांना दिलेला शब्द फडणवीस सरकारने पूर्ण केला होता.

त्यावेळी मंगळवेढा तालुक्यातून फटाके फोडून व पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तर विरोधकांकडून या अगोदरही अशी मंजुरी मिळाली होती यात नवीन काय? असं म्हणत या मंजुरीची खिल्ली उडवली जात होती

मात्र पहिल्या टप्प्यातील 111 कोटीच्या कामाचा शुभारंभ होत असल्याने विरोधकांना टीका करण्यासाठी शब्द सुचेनासे झाल्याचे चित्र दिसत आहे.

पहिल्या टप्प्यात पंप हाऊस बांधकाम करणे,उर्ध्वगामी नलिका क्रमांक एकचे काम सुरू करणे, शेलेवाडी येथे वितरण कुंड तयार करणे, या कामाचा समावेश आहे त्यामुळे नुसत्या मंजुऱ्या देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा धंदा राजकारण्यांनी मांडला आहे असे म्हणणाऱ्यांना एक प्रकारे चपराक बसली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या टीमकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

या कार्यक्रमासाठी खा.ओमराजे निंबाळकर, खा.धैर्यशील मोहिते पाटील, खा.प्रणिती शिंदे, आ.अरुण लाड. आ.सुभाष देशमुख, आ.राजेंद्र राऊत, आ.यशवंत माने, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, आ.विजयकुमार देशमुख, आ.संजय मामा शिंदे, आ.शहाजी बापू पाटील,माजी आ.प्रशांत परिचारक, आ जयंत आसगावकर, आ.बबनदादा शिंदे,आ.सचिन कल्याणशेट्टी, आ.राम सातपुते हे उपस्थित राहणार आहेत.

या विकास कामांचेही उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार

मंगळवेढा उपसा सिंचन योजना (७०० कोटी) पंढरपूर एमआयडीसी, तामदर्डी बंधारा (३५ कोटी), उपजिल्हा रुग्णालय मंगळवेढा(१०० कोटी) व कर्जाळ कात्राळ ते नॅशनल हायवे पर्यंतचा रस्ता (२०० कोटी) या विकास कामांचेही उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडेदेवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 26, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत जाऊनही ग्रामसेवक भेटत नाही? राज्य सरकारने गुपचूप घेतला ‘हा’ मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

August 24, 2026
Next Post
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

वीरशैव लिंगायत संकल्प सभा आज मंगळवेढ्यात; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार; संत बसवेश्वर, संत चोखामेळा स्मारकासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता?

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..