mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अठरा गुन्ह्यांतील ‘वॉन्टेड’ तरुणाला अटक ‘एलसीबी’ची कामगिरी; नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त; मंगळवेढ्यातील ‘या’ शुगर फॅक्टरीमध्ये चोरी केल्याचे निष्पन्न

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 24, 2024
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टीम मंगळवेढा टाईम्स ।

अठरा गुन्ह्यात ‘वॉन्टेड’ असलेल्या व गेल्या पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

तपासादरम्यान त्याने मंगळवेढ्यातील आवताडे शुगर फॅक्टरीमध्ये चोरी केल्याचे निष्पन्न झाले. विकलेला माल भंगार व्यावसायिकाकडून हस्तगत करण्यात आला असून, त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील बालाजीनगरात असलेल्या आवताडे फॅक्टरीच्या आवारातील स्टोअर रूमच्या खिडकीचे गज तोडून, अज्ञात चोरट्यांनी १३ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री १२:३० च्या  दरम्यान ५ लाख ९४ हजार ७२० रुपयांचे साहित्य चोरीला नेल्याची फिर्याद सुरक्षा अधिकारी चंद्रकांत नारायण राठोड (वय ४८) यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली होती.

रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोहोळ येथे गेले होते. तेथे फौजदार ख्वाजा मुजावर यांना गोपनीय माहिती मिळाली.

बातमीदाराने त्यांना आवताडे शुगर फॅक्टरीची चोरी सूरज ऊर्फ डम्या रवी चव्हाण याने साथीदाराच्या मदतीने केल्याचे सांगितले. पथकाने सौंदणकट येथे त्याला ताब्यात घेतले. तपासात त्याने साथीदारासमवेत चोरी केल्याचे सांगितले.

भंगार व्यावसायिक जावेद शेख याला ताब्यात घेऊन, चोरीला गेलेले पाच लाख ९४ हजार ७२० रुपयांचे साहित्य व गुन्ह्यात वापरलेले तीन लाखांची वाहने जप्त केली.

दोन दिवसांची पोलिस कोठडी

दोघांना मंगळवेढा न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या पथकाने पार पाडली.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अट्टल चोरट्याला अटक

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
Next Post
मोठी बातमी! मनोज जरांगेंनी स्पष्ट केली आंदोलनाची पुढची दिशा; उठताही येत नाही, बोलतानाही त्रास

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रकृती प्रचंड खालावली; अंतरवाली सराटीत महिलांनी फोडला टाहो; ग्रामस्थांना अश्रू अनावर

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 4, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..