टीम मंगळवेढा टाईम्स।
कौशल्य विकास’चा लाभ राज्यातील युवक-युवतींना लाभ मिळावा यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे सुरु केली जाणार असून राज्यातील एक हजार तर सोलापूर जिल्ह्यातील २६ महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण केंद्रे असणार आहेत.
महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानाच्या धर्तीवर आचार्य चाणक्य कौशल्य केंद्रे सुरु केली जात आहेत.
शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता वर्धा येथील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेच्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचीही उपस्थिती असणार आहे.
त्या सभेतच आचार्य चाणक्य कौशल्य केंद्रांचे ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील केंद्रांतर्फे प्रत्येकी १५० युवक-युवतींना ५२ कोर्सेसवर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
त्यात सोलर एलईडी टेक्निशियन, डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर, डेअरी फार्मर, डेअरी वर्कर, गोट-शिप फार्मर, टेडाबेस, वेब डेव्हलपर, सोशल मिडिया एक्झुक्युटिव्ह, अकांउंट असिस्टंट, हेल्थ केअर अशा कोर्सेसचा समावेश आहे.
सोलापूरमधील ‘या’ कॉलेजमध्ये असणार केंद्रे
श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय (बार्शी), स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी (सोलापूर), सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स ॲण्ड राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज (अक्कलकोट), भाऊराव पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्स (अनगर), ‘एसएसएसएम’ डिप्लोमा इन आर्किटेक्चर (सोलापूर),
एस. एस. गणपतराव महाराज डिग्री कॉलेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस (सोलापूर), स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक (दोन्ही पंढरपूर), सोजर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्युट (बार्शी), ग्लोबल व्हिलेज आर्ट्स सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज (बोरामणी), श्री साई आयटीआय सासुरे-वैराग (ता. बार्शी),
लोकमंगल फाउंडेशन (सोलापूर), लोकमंगल ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट कॉलेज आणि लोकमंगल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्युट व लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसी (तिन्ही सोलापूर),
सौ.सुवर्णलता गांधी महाविद्याल (वैराग), एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च (बार्शी), लाटे अण्णासाहेब चांदणे कृषी तंत्रनिकेतन (एखतपूर, सांगोला),
लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर ॲण्ड ज्यु. कॉलेज (माढा), श्रीनाथ विद्यालय ॲण्ड ज्यु. कॉलेज (माळशिरस), श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक (सोलापूर), माणदेश महाविद्यालय (सांगोला), दलितमित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज (मंगळवेढा), सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (बार्शी), साई आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर (बार्शी) आणि इंदिरा इन्स्टिट्युट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग (बार्शी).
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज