टीम मंगळवेढा टाईम्स ।
अनिल सावंत यांनी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला मंगळवेढा तालुक्यातील तब्बल 5 हजाराहून अधिक महिलांनी हजेरी लावली असल्याचे दिसून आले.
यावेळी टिपक्यांची रांगोळी या मालिकेतील अभिनेत्री (लाडकी अप्पू) ज्ञानदा रामतीर्थकर, सेलिब्रिटी अँकर आर जे अक्षय यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. भारत मुढे यांनी अतिशय सुंदर निवेदन केले.
अनिल सावंत बोलताना म्हणाले की, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत खास आहे कारण आपण सगळे एकत्र येऊन “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” या कार्यक्रमाचा आनंद लुटणार आहात.
हा कार्यक्रम फक्त मनोरंजनासाठीच नाही तर आपणा सर्वांच्या कलेला आणि कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.
आपण आपल्या घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत विविध प्रसंगात आपले कौशल्य दाखवतात हे खरोखर प्रेरणादायी आहे.
मी आज गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मी आज पंढरपूर मध्ये राहत आहे आणि मंगळवेढा आणि पंढरपूर या विधानसभेमध्ये काम करत आहे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या माध्यमातून आणि हे काम करत असताना शेतकरी हा मुख्य गाभा ठेवूनच आतापर्यंत आम्ही काम करत आलेलो आहे.
मंगळवेढा मधील पाण्याचे जेथील प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी एखादा उद्योग उभारणी खूप महत्त्वाचे होते आणि आम्ही स्वतः तो उद्योग उभा केलेला आहे आणि त्या उद्योगासाठी पाण्याची सोय ही की भविष्यासाठी आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के करणार आहोतच.
महिलांना डोक्यावरून हंडे भरून आणताना जो त्रास होतो तो मी लहान पणापासून पहिला आहे. तो त्रास मी पिण्याचे पाणी आणून नक्की कमी असे असे भवूराया म्हणून आपणास वचन देतो असे सावंत म्हणाले.
तसेच मी स्वतः वारकरी संप्रदायातला असून वारकऱ्यांविषयी आरोग्यासाठी मी भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे तरी आज या माध्यमातून काम करत असताना अधिकच काम करण्यासाठी
महिलांसाठी, लहान मुलांचे शिक्षणासाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच तरुण उद्योजकांसाठी मला काम करण्याची संधी या मतदारसंघातून मिळावी अशी मी आशा व्यक्त करतो आणि मी स्वतः या मतदारसंघातून उभे राहण्यासाठी चांगल्या प्रकारे इच्छुक आहे असे त्यांनी सांगितले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज