टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर येथील होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यास डीजीसीएने हिरवा कंदील दाखवला असून, आठवडाभरात त्यांच्याकडून लेखी परवाना प्रमाणपत्र मिळणार आहे.
प्रत्यक्ष विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांशी बोलणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या आठवड्यात डीजीसीएने होटगी रोड विमानतळाची पाहणी केली. काही किरकोळ दुरुस्त्या सुचविल्या. त्यानंतर लगेच जिल्हा प्रशासनाने त्या किरकोळ त्रुटीदेखील पूर्ण केल्या.
दुरुस्ती केलेल्या कामांचे फोटो अन् व्हिडीओ जिल्हा प्रशासनाने डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले. त्यांच्याकडून यास मंजुरी मिळाली आहे. ही माहिती जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला कळवली आहे.
प्रत्यक्ष विमान कंपन्यांशी सध्या बोलणी सुरू आहे. परवाना आल्यानंतर विमानसेवा मार्गाचा सर्व्हे होईल. त्यानंतर मार्ग निश्चित केल्यानंतर सेवेच्या निविदा काढण्यात येणार आहे.
विमानतळ परिसराला लागून असलेल्या नागरी वसाहतीच्या खिडक्या विमानतळाच्या दिशेने होत्या. या खिडक्या बंद करण्याची सूचना सिव्हिल एव्हिगेशन टीमने केली. त्यानसार जिल्हा प्रशासनाने खिडक्या बंद केल्या.
विमानतळाला लागून असलेल्या मोकळ्या जागेत मोठे दगड आढळले. विमानतळ परिसरातून दगड काढून टाकण्याची सूचना पथकाने केली होती. त्यानुसार विमानतळ परिसरात कार्यवाही झाली, अशी माहिती प्रशासनाने दिली.
तीन एकर जागा ताब्यात घेऊ
नये, यासाठी कारखाना प्रतिनिधींनी प्रभारी अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्याकडे अपील केले आहे. याप्रकरणी आमचे म्हणणे सादर केल्याशिवाय निर्णय घेऊ नये, यासाठी विमानतळ प्रशासनाने अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे कॅव्हेट दाखल केला होता.
कॅव्हेटवर बुधवार, १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर या दहा दिवस रजेवर होत्या. उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्याकडे त्यांचा अतिरिक्त पदभार होता.
बुधवारी मोनिका सिंग ठाकूर या रुजू होत आहेत. त्यामुळे बुधवारी दुपारी त्यांच्या कार्यालयात सुनावणी होईल. विमानतळाची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. त्यानंतर त्यावर कारखाना प्रशासनाचेही म्हणणे ऐकले जाणार आहे.(स्रोत:लोकमत)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज