टीम मंगळवेढा टाईम्स।
सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा अर्चा सुरू आहे.
अशाचत एक व्हिडीओनं सोशल मीडियात खळबळ उडालीय. या व्हिडीओत पोलिसांनी गणपती बाप्पालाच अटक केल्याचा दावा करण्यात आलाय.
या व्हिडीओत काही कार्यकर्ते घोषणाबाजी करतायेत. तर पोलिसांनी गणपतीची मूर्ती ताब्यात घेतल्याचं दिसतंय. याच व्हिडीओवरून सोशल मीडियात चर्चांना उधाण आलं. व्हायरल मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय, जाणून घेऊ…
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस शासित कर्नाटक सरकारनं गणपती बाप्पाला अटक केली. काँग्रेसला मत देणाऱ्या हिंदूंना लाज वाटायला हवी”, हा मेसेज व्हायरल होतोय.
गणपती बाप्पा हा श्रद्धेचा विषय असल्यानं साम टीव्हीनं या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली. आम्ही हा नेमका प्रकार काय आहे हे शोधून काढलं. तेव्हा आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं, जाणून घेऊ…
व्हायरल व्हिडीओ कर्नाटकातल्या बंगळुरूतला आहे. 13 सप्टेंबरला मांड्या जिल्ह्यात धार्मिक हिंसाचार उफळला होता. त्याचा निषेध करण्यासाठी काही जण रस्त्यावर उतरले होते. त्यापैकी एका व्यक्तीनं आंदोलनात गणपती बाप्पाची मूर्ती आणली.
परवानगी न घेता आंदोलन केल्यानं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यावेळी पोलिसांनी गणपती बाप्पाची मूर्तीही पोलिस व्हॅनमध्ये ठेवली.
त्यामुळे आमच्या पड़ताळणीत कर्नाटक सरकारनं गणपती बाप्पाला अटक केल्याचा दावा असत्य ठरलाय. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यावेळी आंदोलकांच्या हातात गणपतीची मूर्ती होती. पोलिसांनी कुणालाही गणेश पूजनासाठी विरोध केला नाही.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज