मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्यातील सात सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी बदल्या केल्या आहेत.
दरम्यान , पांगरीचे एस . ए . हुंदळेकर यांची नियंत्रण कक्ष , कामती पोलिस ठाण्याचे के . टी . उंदरे यांची जिल्हा विशेष शाखा,स्थानिक गुन्हे शाखेचे अतुल भोसले यांची कामती पोलिस ठाणे, अकलूज पोलिस ठाण्याचे सुधीर तोरडमल याची पांगरी पोलिस ठाणे, बार्शी शहरातील शिवाजी जायपत्रे यांची बार्शी तालुका पोलिस ठाण्यात तर मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.पी. धांडे यांची वाचक येथे बदली करण्यात आल्याचे पत्र सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी काढले.
बदली करण्यात आलेल्या अधिका यांची प्रभारी म्हणून तात्काळ पदभार स्वीकारावा असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज