टीम मंगळवेढा टाईम्स ।
पारधी समाजातील तरूणांना सरकारी नोकरी मिळावी, त्यांना चांगले शिक्षण घेता यावे, सरकारी योजनांसाठी लागणारी कागदपत्रे काढून देणे, यासाठी आता ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्यासाठी ‘पहाट’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलिसांकडील रेकॉर्डनुसार मालाविषयीच्या गुन्ह्यात सर्वाधिक आरोपींचे प्रमाण पारधी समाजातील आहे. ही बाब समजल्यानंतर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्या तरूणांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी व दुसऱ्या तरूणांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी नवीन उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी त्यांनी पोलिस मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये पारधी बांधवांचा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली.
या प्रसंगी एकात्मिक बालविकास आदिवासी प्रकल्पाचे सहायक संचालक श्री. सरतापे, अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, सर्व पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी केले. श्री.सरतापे यांनी यावेळी त्यांच्या विभागाकडील आदिवासींच्या योजनांची माहिती दिली.
काय आहे नेमका ‘पहाट’ उपक्रम?
पारधी समाजातील लोक अनावधानाने रोजीरोटीसाठी गुन्हे करतात, पण त्यात गुन्हा दाखल, अटक, पोलिस कोठडी अशा दुष्टचक्रात अडकतात. त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी विशेष उपक्रम
सरकारी नोकरी व योजनांचा लाभ घेण्यासाठी पारधी समाजातील लोकांना आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड, जातीचा दाखला, अशी कागदपत्रे मिळावीत म्हणून महसूल विभागाच्या मदतीने त्यांच्या वस्त्यांवर विशेष मोहीम
समाजातील शिक्षित तरूणांना सरकारी नोकरी मिळावी म्हणून शिकवणी, भरतीपूर्व प्रशिक्षण अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन
मुलांच्या शिक्षणासाठी शाळा, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध शासकीय विभागाच्या मदतीने पोलिसांकडून पारधी समाजातील तरूणांना तथा कुटुंबांना मदत केली जाणार.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज