टीम मंगळवेढा टाइम्स ।
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एमएमसी) नोंदणी असलेल्या डॉक्टरांना आता ‘क्यूआर कोड’ दिला जाणार आहे. तो स्कॅन करताच संबंधित डॉक्टरची पदवी, पदविका तसेच अनुभव आदी माहिती पेशंटला कळू शकेल.
यावर सध्या काम सुरू असून सहा महिन्यांत हे क्यूआर कोड रुग्णालयांत लावले जातील, अशी माहिती मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. विकी रुघवानी यांनी बोलताना दिली. बोगस डॉक्टरांना चाप बसण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
आयुर्वेद, होमिओपॅथी यासह इतर पॅथीच्या पदवी असताना किंवा कोणतीही पदवी न घेता अॅलोपॅथीची औषधे लिहून देणारे अनेक अॅलोपॅथीचे बोगस डॉक्टर सध्या राजरोस प्रॅक्टिस करत आहेत.
अनेकदा ग्रामीण भागात एखाद्या डॉक्टरकडे काम करणारे कंपाउंडरही रुग्णालये थाटतात. पैसे कमावण्यासाठी रुग्णांच्या जिवाशी खेळ केला जातो.
अशा बोगस डॉक्टरांना चाप बसावा आणि नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती एका स्कॅनवर रुग्ण, नातेवाइकांना मिळावी, यासाठी ‘एमएमसी’ ने क्यूआर कोडची संकल्पना आणली आहे.
एमएमसीकडे १ लाख ९४ हजार डॉक्टरांची नोंदणी आहे. त्यापैकी १ लाख ३४ हजार जणांनी पुनर्नोदणी केली आहे.
या नोंदणीकृत डॉक्टरांना एमएमसी हा क्यूआर कोड देईल. पुढील ६ महिन्यांत रुग्णालयांत हे कोड लावले जातील. त्यामुळे रुग्णांना डॉक्टरांची पदवी व इतर माहिती मिळू शकेल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज