टीम मंगळवेढा टाईम्स ।
सांगोला येथील डॉ. ऋचा रूपनर आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील भाऊसाहेब आनंदा रूपनर यांना पंढरपूर येथील सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.
सत्र न्यायालयाने मृत डॉ.ऋचा रूपनर यांच्या नावे तयार केलेल्या कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या केल्याप्रकरणी अटकेतील स्नेहल प्रशांत आगवणे (रा.पंढरपूर)
या महिला आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केल्याचे तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी सांगितले.
सांगोला येथील फॅबटेक उद्योग समूहाचे चेअरमन भाऊसाहेब रूपनर यांची सून डॉ. ऋचा सूरज रूपनर-पाटील यांनी गुरुवार, ६ जून रोजी पहाटे ३:३०च्या सुमारास फॅबटेक कॉलेज शेजारील राहत्या बंगल्यातील डायनिंग हॉलमधील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
याप्रकरणी ऋषिकेश संजय पाटील (रा. पंढरपूर) यांच्या फिर्यादीवरून पती डॉ. सूरज भाऊसाहेब रूपनर याच्यावर पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर फिर्यादी यांच्या पुरवणी जबाबावरून पोलिसांनी मृत डॉ. ऋचाचे सासरे व सासू सुरेखा रूपनर यांची नावे नमूद केली होती.
यापैकी सासऱ्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी १२ जून रोजी अटक केली होती. या प्रकरणात आरोपी सासूला पंढरपूर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
दरम्यान, मृत डॉ. ऋचा यांनी आत्महत्या करण्याच्या आदल्या दिवशी पतीच्या सांगण्यावरून सोनोग्राफी सेंटरमध्ये काम करणाऱ्या स्नेहल प्रशांत आगवणे या महिलेने डॉ. सूरज रूपनर यांनी डॉ. ऋचा यांच्या नावे एजंटमार्फत तयार केलेल्या बँक प्रकरणावर खोट्या सह्या केल्या होत्या.
पोलिस तपासादरम्यान ही बाब उघड झाल्याने तपास अधिकाऱ्यांनी सदर महिलेस अटक करून चौकशीअंती जाबजबाब घेतले होते. त्यानंतर आरोपी महिलेची रवानगी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात केली आहे.
दरम्यान, गेल्या महिनाभरापासून आरोपी पती व सासरे दोघेही पिता-पुत्र न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यापैकी सासरे यांना पंढरपूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे पोलिसांनी सांगितले.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज