mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! पेरण्यांची गडबड करू नका, मान्सूनचा जोर कमी होण्याची शक्यता; दमदार पावसाने बळीराजा सुखावला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 9, 2024
in राष्ट्रीय
शेतकऱ्यांनो! पेरणी संदर्भात कृषी अधिकारी यांनी केले महत्त्वपूर्ण आवाहन; यंदाच्या खरीप हंगामात योग्य नियोजन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला असून शेतकऱ्यांनी पिकांच्या लागवडीची आणि पेरण्यांची लगबग सुरू केली आहे. दरम्यान, ज्या भागांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली अशा शेतकऱ्यांनी पेरण्या आणि कापसाच्या लागवडीही केल्या आहेत पण मराठवाडा, विदर्भात मान्सूनचा पाऊस कधी पोहोचणार आणि शेतकऱ्यांनी पेरण्या कधी कराव्यात यासंदर्भातील ही माहिती.

मान्सून आज महाराष्ट्रातील सोलापूर, हर्णाई, बारामती व तेलंगणातील निझामबाद पर्यन्त पोहोचला असून मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण कायम आहे.

पाऊस कसा असेल?

दक्षिण कोकण किनारपट्टी समोरील अरबी समुद्रातील हवेच्या कमी दाबाच्या आसामुळे, मुंबईसह संपूर्ण कोकणात आजपासुन पुढील आठवडाभर म्हणजे शनिवार दि. १५ जूनपर्यंत जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते. काही ठिकाणी अतिवृष्टीचाही अनुभव मुंबईकरांना ह्या आठवड्यात येऊ शकतो, असे वाटते.

महाराष्ट्रात पाऊस कसा?

मुंबईतल्या ह्या पावसामुळे नैऋत्य मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा उर्जीतावस्थेत येऊन मान्सून उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर तसेच संपूर्ण पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यापर्यंत खेचला जाऊ शकतो. तेथे म्हणजे ह्या १८ जिल्ह्यात बुधवार दि. १२ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पूर्व मोसमी वा मोसमी पावसाची शक्यता जाणवते.

महाराष्ट्रात खरीप पेरणीची स्थिती काय असू शकते?

महाराष्ट्रात १५ जूनपर्यन्त जो काही पाऊस होईल, त्या ओलीवरच चांगल्या प्रतीच्या जमिनीत व जेथे १० से.मी. चांगली ओल साध्य झाली असेल म्हणजे पेर-उतार नंतर पीक रोप ३० ते ४० दिवस दम धरेल अशाच खात्रीच्या ठिकाणी, २० जून दरम्यान पेरणी होवू शकते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी खात्रीच्या ओलीवरच व सिंचनाची काही सोय असेल अशाच ठिकाणी स्वतःच्या निर्णयावरच पेरणीचे धाडस २० जून दरम्यान करावे. कारण १५ जूननंतर कदाचित पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून फार सावधगिरीने, संयमाने पेरणीचे पाऊल टाकावे.

सध्या मान्सूनसाठी वातावरणीय आशादायक चित्र काय आहे?

जमिनीपासून ३ ते ६.५ किमी. उंच अश्या साडेतीन किलोमीटर क्षेत्र हवेच्या जाडीत पूर्वेकडून -पश्चिमेकडे व त्याच्या खाली पश्चिमेकडून -पूर्वेकडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांचा उंचावरील असलेला ‘शिअर झोन’ हा सध्या १६ डिग्री अक्षवृत्त समांतर म्हणजे मान्सून पोहोचलेल्या सीमा रेषेच्या थोडा उत्तरेकडे आहे.

दुसरी प्रणाली म्हणजे अरबी समुद्रात दक्षिण कोकण ते केरळ पश्चिम किनारपट्टीत समुद्रसपाटीपासून साधारण दिड किलोमीटर उंचीपर्यंतचा हवेच्या कमी दाब क्षेत्राचा निर्वात पोकळीचा पट्टा म्हणजेच इंग्रजी ‘V’ अक्षरासारखा द्रोणीय तटीय आस म्हणजेच त्याला ‘ऑफ-शोर-ट्रफ’ म्हणतात.

त्याचे अस्तित्व जाणवत आहे. खरं तर हवामान शास्त्राप्रमाणे त्याला लगेचच ‘ऑफ-शोर-ट्रफ’ म्हणणे चुकीचे ठरेल कारण अजून मान्सून पूर्णपणे पोहोचला नाही. तरी देखील त्याच्या सदृश्य स्थिती आहे. अश्या दोन मुख्य व लाभदायी प्रणालीमुळे मान्सून मध्ये ऊर्जा भरली जाऊन सध्या पावसाची शक्यता जाणवते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शेतकरी पेरणी

संबंधित बातम्या

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
Next Post
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

बनवाबनवी! ऊसतोडीसाठी मजूर पुरवतो म्हणून मंगळवेढ्यातील मुकादमाला दोन लाखाला फसविले

ताज्या बातम्या

माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 13, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा