mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भविष्यवाणी! लोकसभेच्या निकालाबद्दल प्रसिद्ध ज्योतिषाचं मोठं भाकीत; महाराष्ट्रात ‘यांचेच’ सर्वाधिक उमेदवार जिंकणार; ठाकरे गटाला किती जागा मिळणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 29, 2024
in राजकारण, राज्य
मंगळवेढ्यातील ‘या’ सरपंचाला शाळेत शिकवण्याची जबाबदारी पार पाडण्याची दुर्देवी वेळ; आमदार साहेब येण्याच्या दिवशी शिक्षक पाठवून डोळे पुसण्याचा केला प्रयत्न

टीम मंगळवेढा टाईम्स ।

लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला जाहीर होणार आहे. या निकालाआधी प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.

अजित पवार गटाला एकाही जागेवर यश मिळणार नाही. तर शरद पवार गट हा अजित पवार गटापेक्षा सरस ठरणार आहे. तसेच ठाकरे गटाला देखील या निवडणुकीत सहानुभूतीचा फायदा होणार असल्याचा दावा अनिल थत्ते यांनी केला आहे. असं असलं तरीही महाराष्ट्रात महायुतीचेच सर्वाधिक उमेदवार जिंकणार असल्याचं भाकीत अनिल थत्ते यांनी वर्तवलं आहे.

महायुती महाराष्ट्रात 37 ते 40 जागा जिंकणार तर उर्वरित जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार, असा मोठा दावा अनिल थत्ते यांनी वर्तवला आहे.

अनिल थत्ते यांनी देशात महायुतीच्या किती जागा येणार? याबाबतही भाकीत वर्तवलं आहे. तसेच बारामती, ठाणे, कल्याण लोकसभेच्या जागांवर कोण जिंकणार? याबाबतही भविष्यवाणी सांगितली आहे.

“महायुतीला 37 ते 40 जागा मिळतील, असा माझा अंदाज आहे. मात्र महाविकास आघाडी गेल्यावेळी शूद्र पातळीवर होती. त्यामानाने त्यांच्यामध्ये इम्प्रूमेंट होईल. त्यांना जर 37 मिळाल्या तर उर्वरित सीट महाविकास आघाडीला मिळतील.

दोन अंकी आकडा महाविकास आघाडी गाठेल, असं मला वाटतं. अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही असा मला अंदाज आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये शरद पवार सरस होतेच, आहेत आणि यावेळी अधिक सरस झाले आहेत.

ठाकरे गटाला सहानुभूती आहे यात शंका नाही”, असं मोठं वक्तव्य अनिल थत्ते यांनी केलं आहे. “अजित पवारांना महायुतीत घेतल्याने ऑलरेडी तोटा झालाय. त्यांचे डझनभर मंत्री सोसावे लागले आणि त्यांच्यामध्ये ती लॉयल्टी दिसली नाही”, असंदेखील मोठं वक्तव्य अनिल थत्ते यांनी केलं.

देशात महायुतीला किती जागा मिळतील?

“भारतीय जनता पार्टीने 400 पारचा नारा इतका लावला की 350 जरी मिळाल्या तरी लोक म्हणतील 400 कुठे मिळाले? यात महाराष्ट्राचा वाटा सगळ्यात मोठा असेल, असं गृहीत धरलं होतं. वातावरण इतकं विचलित आणि गढूळ झालं होतं, संभ्रम निर्माण झाला होता.

मात्र माझा अंदाज असा आहे की, 35 ते 40 जागा महायुतीला येतील. महायुतीला 35 ते 40 जागा मिळतील, असा माझा 100 टक्के विश्वास आहे. म्हणजेच 8 ते 13 जागा महाविकस आघाडीला मिळतील”, असं भाकीत अनिल थत्ते यांनी वर्तवलं.

“महाआघाडीने प्रचारात घेतलेले दोन मुद्दे खूप महत्त्वाचे ठरले. सत्ताधाऱ्यांना बहुमत मिळाले तर ते संविधान बदलतील. आपल्या समाजात बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाबद्दल नातं जपलेले अनेक लोक आहेत. त्यामुळे ते लोक विचलित झाले. त्यात त्यांना यश मिळाले. संविधानाबरोबरच हुकुमशाही देखील येईल. त्यामुळे मुस्लिम वर्ग आणि दलित वर्ग दुखावला.

तर महायुतीने केवळ मोदींचा चेहरा हा एकच मुद्दा मांडला. महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात इतर राज्यांमध्ये दिसतो तेवढा कडवटपणा नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लिम हा मुद्दा महाराष्ट्रात फार चालेल असं मला वाटत नाही”, असं अनिल थत्ते म्हणाले.(स्रोत:TV9 मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लोकसभा निवडणूक 2024

संबंधित बातम्या

मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 4, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 26, 2026
Next Post
शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या वृषाली कोरेने दिला मोबाइल, टीव्हीपासून दूर राहण्याचा सल्ला; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने वृषालीचा सन्मान

शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या वृषाली कोरेने दिला मोबाइल, टीव्हीपासून दूर राहण्याचा सल्ला; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने वृषालीचा सन्मान

ताज्या बातम्या

श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्या निमित्ताने आज मंगळवेढ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; झी टॉकीज फेम बाल कीर्तनकारचे होणार कीर्तन

मंगळवेढ्यात आज रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न होणार; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

September 4, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या मंगळवेढा तालुका १००% बंद; सकल मराठा समाज आक्रमक, प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

September 3, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 4, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मत मागायला दारी, तर समस्या सोडवायलाही जनतेच्या दारीच! आमदार आवताडे गावपातळीवर करणार थेट मुक्काम; गावकऱ्यांच्या समस्यांचे जागेवरच होणार निरसन

September 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा