mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोहिते पाटलांविरोधात देवेंद्र फडणवीसांचं चक्रव्यूह; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी सर्वपक्षीय मोहिते विरोधक भाजपसोबत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 26, 2024
in सोलापूर
धोक्याची घंटा! सोलापूर, माढा आणि बारामती मतदारसंघात भाजप जिंकू शकणार नाही; मोहिते पाटील यांची माहिती; धैर्यशील मोहिते पाटील ‘या’ पक्षातून लढणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले असून बुधवारी रात्री पुण्यात तालुक्यातील सर्व पक्षीय मोहिते विरोधक नेत्यांची बैठक घेत त्यांना भाजपसोबत आणले आहे.

या मोठ्या घडामोडीमुळे मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांना मोठा धक्का मनाला जात आहे.

पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी फडणवीसांची मोर्चेबांधणी

यापूर्वीच माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाच्या अनेक नेत्यांनी मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्या सोबत न जाण्याचा निर्णय करीत भाजपाला पाठिंबा दिला होता. आता माळशिरस तालुक्यातील इतर पक्षीय नेत्यांनाही एकत्रित करीत त्यांनाही भाजपसोबत आणण्यात फडणवीस यांना मोठं यश मिळालं आहे.

करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी पुढाकार घेत हे सर्व नेत्यांना पुण्यात फडणवीस यांची भेट घालून दिली. यावेळी खासदार रणजित निंबाळकर देखील उपस्थित होते. माळशिरस तालुक्यातील एवढ्या मोठ्या संख्येने नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने, उत्तम जानकर यांच्यामागे आता कोण उरले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सर्वपक्षीय मोहिते विरोधक नेते भाजपसोबत

बुधवारी रात्री माळशिरस तालुका विकास आघाडीसोबत फडणवीस यांनी ही बैठक घेतली. यावेळी लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते एडवोकेट सोमनाथ अण्णा वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर भैय्या सुळ पाटील,

युवा उद्योजक अमोलशेठ यादव, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि माळशिरस तालुका संयोजन प्रमुख बाळासाहेब सरगर, महाराष्ट्र ऊस वाहतूकदार संघटना अध्यक्ष ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ॲड .प्रशांतराव रुपनवर पाटील,

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष शिवराज पुकळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष आणि माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक सुरेशराव टेळे, रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे उपस्छिच होते.

फडणवीसांनी घेतली भेट

याशिवाय, माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील ज्येष्ठ नेते आणि मेडद गावचे माजी सरपंच पैलवान नाथाआबा लवटे पाटील, कनेर गावचे जनतेतील लोकनियुक्त सरपंच बाजीराव माने पाटील, खुडूस गावचे जनतेतील लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक विनायक ठवरे पाटील सर, भांबुर्डी चे माजी सरपंच दादासाहेब वाघमोडे, कोथळे गावचे सरपंच अमोल माने, एकशिव गावचे माजी सरपंच गुणवंत पाटील,

माळशिरस वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड .विकास नारनवर, कारंडे ग्रामपंचायत सदस्य महेश थिटे,पैलवान नवनाथ काळे उद्योजक गोरखशेठ देशमुख दादासाहेब काळे, आर के खरात, मुकुंद काळे, विकास काळे, सचिन बोरकर, खंडू माने, स्वप्निलकुमार राऊत,

रोनकभैय्या सुळ पाटील, सागर ठोंबरे, सचिन सरतापे, गणेश वाघमोडे, राजेंद्र सिद, पांडुरंग मगर, सागर खोमणे, साहिल चव्हाण, आप्पासो सुळ असे तालुक्यातील बहुतांश नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मोहिते पाटीलांना रोखण्यासाठी फडणवीसांची व्यूहरचना

येत्या मंगळवारी म्हणजे 30 एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात गेल्या वेळी अकलूज येथे झालेल्या सभेपेक्षा मोठी सभा घेण्याचे महायुतीचे प्रयत्न असून माळशिरस तालुक्यातून जास्तीतजास्त पाठिंबा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

याच तालुक्यात मोहिते पाटील यांना रोखण्याची व्यूहरचना फडणवीस करीत असून माळशिरस तालुक्यात मताधिक्य मिळविण्याची समीकरणे जुळविण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती.

येत्या 30 एप्रिल रोजी अकलूज पेक्षा मोठी सभा घेण्यात भाजपाला यश आल्यास मात्र, मोहिते पाटील आणि जानकर यांना मोठा धक्का असू शकणार आहे. माळशिरस येथील शेती महामंडळाच्या 28 एकर जागेवर सकाळी अकरा वाजता या सभेचे आयोजन केले आहे.(स्रोत:,ABP माझा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मोहिते पाटील

संबंधित बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 17, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
Next Post
संधी! 10वी,12वी उत्तीर्ण धारकांना मोठ्या कंपनीत नोकरीची संधी, मंगळवेढ्यात विविध पदासाठी होणार मोठी भरती; येथे करा अर्ज

नागरिकांनो! पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणं अनिवार्य; 'या' तारखेपर्यंत न केल्यास होईल कारवाई

ताज्या बातम्या

कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 18, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळजनक! बँकेतून पैसे काढून बाहेर येताच वृद्ध शेतकऱ्याची पिशवी कापली; घरकुल योजनेचे ५० हजार लंपास; मंगळवेढ्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

April 18, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

धक्कादायक! खेळता खेळता शेततळ्यात पडून दोन वर्षीय चिमुरड्याचा अंत; मंगळवेढ्यातील हृदयद्रावक घटना

April 18, 2026
​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

April 17, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा