टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात गेल्या आठवड्यापासून वातावरण पूर्णपणे बदलून गेलं आहे. कधी सोसाट्याचा वारा तर अवकाळी पाऊस तर कधी गारांनी झोडपलं आहे. या अशा वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे.
एकीकडे कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना दुसरीकडे वळवाचा नागरिकांना झोडपून काढत आहे. सोलापूर जिल्ह्यातही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली. यादरम्यान एक घटना सर्वांना चटका लावून गेली. सोलापुरात अंगावर विज पडून आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली. मुस्ती गावातील शेतात वीज पडून लावण्या हनुमंता माशाळे या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सकाळपासून कडक ऊन असताना अचानकपणे हवामानात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. लावण्या माशाळे हिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
दुर्दैवी घटनेनंतर मुलीच्या नातेवाईकांचा सरकारी रुग्णालयात मोठा आक्रोश पाहायला मिळाला. अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज