टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद, शेटफळ येथे अनधिकृत केलेल्या वाळू साठ्याचे पंचनामे करावयास गेलेल्या मंडल अधिकाऱ्याला, तू माझ्या घरासमोरील वाळू साठ्याचा पंचनामा कसे करतो ते बघतो,
तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन माझ्या खिशात असून तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सचिन हरिदास बोडके (रा. महमदाबाद) व अन्य दोन अनोळखी व्यक्ती अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी मारापूर मंडल अधिकारी चंद्रकांत गणपतराव इंगोले (वय ५३) हे गुरुवारी (ता. २८ रोजी) तहसीलदार यांच्या तोंडी आदेशाने महमदाबाद, शेटफळ गावच्या शिवारात घरासमोरील अनधिकृत वाळू साठ्याचा पंचनामा करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य संतोष सोनवले यांना सोबत घेऊन गेले होते.
यातील संशयित आरोपी सचिन बोडके याच्या घरासमोरील अनधिकृत वाळू साठ्याचा पंचनामा करीत असताना संशयित बोडके याने, तुम्ही तोंडे बघून पंचनामे करीत आहात, मी सांगेल त्या सर्वांचे पंचनामे करा. त्यांचे पंचनामे झाल्याशिवाय माझ्या घरासमोरील वाळूच्या ढिगाऱ्याचा पंचनामा करावयाचा नाही, असे म्हणत असताना
मंडल अधिकारी इंगोले यांनी, अनधिकृत सर्व साठ्यांचे पंचनामे करण्यासाठीच आलेलो आहोत, असे म्हणताच संशयित बोडके याने, तुम्ही आधी माण नदीपात्रातील उत्खनन झालेल्या वाळूचे पंचनामे करा, असे म्हणून शिवीगाळ करीत अंगावर येऊन लाथ मारली.
त्यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य संतोष सोनवले यांनी, असे करू नको, तू व्यवस्थित बोल’ असे समजावून सांगत असताना बोडकेने त्यांचे न ऐकता, तू मंडल अधिकारी मारापूर पदावर कसे काम करतो ते पाहतो,
माझे लांबपर्यंत हात आहेत, तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन माझ्या खिशात आहे. तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, फिर्यादी हे दुसऱ्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी महमदाबाद ते लक्ष्मी दहिवडी रोडवर जात असताना संशयित आरोपी सचिन बोडके याने मोटारसायकलवर
दोन अनोळखी व्यक्ती बोलावून त्यांनीही पंचनामे करावयाचे नाही, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सर्कल चंद्रकांत इंगोले यांच्या फिर्यादीवरून या तीघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज