टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात कोरोना रुग्ण आणि मृत्यूची संख्या वाढतच चालली आहे. सोमवारी आलेल्या अहवालानुसार शहरात आणखी 29 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात आता एकूण 3 हजार 835 रुग्ण, तर 327 मृत्यू झाले आहेत. 1 हजार 406 रुग्णांवर शहरातील विविध दवाखान्यांत उपचार सुरु असून 2 हजार 102 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. ( Solapur corona updated )
लॉकडाऊन कडकडीत असतानाही कोरोनाची साखळी तुटताना दिसत नाही. रविवारी महापालिकेकडून आलेल्या कोरोना अहवालानुसार 104 कोरोना रुग्ण, तर 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद होती. सोमवारी महापालिकेकडून आलेला अहवाल हा रविवारी रात्री 12 वाजेपर्यंतच्या रुग्णस्थितीचा आहे.
या अहवालानुसार 100 टेस्ट झाल्या असून 71 निगेटिव्ह, तर 29 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकही रुग्ण उपचारानंतर बरा होऊन घरी परतलेला नाही. शहरात आजपर्यंत एकूण 19 हजार 243 जणांची कोरोना चाचणी झाली असून यापैकी 19 हजार 232 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. 11 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
एकूण 3 हजार 835 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, तर उर्वरित 15 हजार 397 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. रविवारपर्यंत एकूण एक हजार 68 जणांना होम क्वारंटाईन, तर संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 968 जण आहेत. लक्षण नसलेले 102 रुग्ण होम आयसोलेशन आहेत.
29 पॉझिटिव्ह रग्णांपैकी दक्षिण सदर बझार एक महिला, जुळे सोलापुरातील लक्ष्मीनगर दोन पुरुष, एक महिला, रेल्वेलाईन्स एक पुरुष, अंत्रोळीकरनगर जयभवानी सोसायटी 1 पुरुष, पापारामनगर 1 महिला, हैदराबाद रोड विडी घरकूल 1 महिला, पुणा नाका 1 पुरुष, रविवार पेठ 1 महिला, बुधवार पेठ 2 महिला, बाळे खडक गल्ली 2 पुरुष, विजापूर रोड बेघर सोसायटी 1 पुरुष, भवानी पेठ 1 पुरुष, सोरेगाव बनसिध्दनगर 2 महिला, आत्मविश्वासनगर1 पुरुष व एक महिला, होटगी रोड लक्ष्मीनगर 3 महिला, 1 पुरुष, साठे चाळ बुधवार पेठ 2 पुरुष, आकाशवाणी रोड माधवनगर 1 महिला, अशी वर्गवारी आहे. दोन मृत्यू झालेल्यांपैकी एक बसवेश्वरनगरातील 65 वर्षीय पुरुष आहे, तर दुसरा मृत माशाळ वस्ती येथील बंजारा सोसायटीतील 50 वर्षीय पुरुष आहे.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज