mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी खळबळ! मंगळवेढ्यातील 24 गावांतील शेतकऱ्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्यांनी दिली वेळ; महाराष्ट्र सरकार मात्र झोपलेलंच

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 12, 2024
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
शेतकऱ्यांनो! जनावरांच्या चाऱ्याची चिंता मिटली; उजनीतून शेतीसाठी सोडलेले पाणी ‘या’ तारखेपर्यंत राहणार; कालव्यातूनही शेतीला पाणी

टीम मंगळवेढा टाईम्स। 

कायम दुष्काळी असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांनी अलमट्टीच्या पाण्यासाठी कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याला आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीही प्रतिसाद दिल्याचं दिसून येतंय.

गुरुवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थेट भेटीची वेळ दिल्याने या गावातील ग्रामस्थ 24 गाड्या घेऊन बंगळुरूकडे रवाना होणार आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी खळबळ उडाली असून शिंदे फडणवीस सरकारसाठी हा धक्का मानला जातोय.

गुरुवारी बंगळुरू येथे मुख्यमंत्री कार्यालयात या 24 गावातील प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडीचा फटका सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीवर होणार असून राज्यातही विरोधकांना प्रचारासाठी आयते कोलीत मिळणार आहे.

कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर गेले अनेक वर्षे राजकारण सुरु असताना महाराष्ट्रातील या 24 गावांनी थेट कर्नाटकाला जोडण्याची मागणी केल्यावर राज्य सरकारला जाग येणे अपेक्षित होते. मात्र या 24 गावांनी ग्राम ठराव करून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता.

यानंतर या गावातील प्रतिनिधींनी दोन बैठक घेतल्यावरही शासनाने यांच्या मागणीची दखल न घेतल्याने या गावांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. यानंतर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी दुपारी 11 ते ३ यादरम्यान भेटीची वेळ दिल्याने या 24 गावातून सर्व प्रतिनिधी आणि ग्रामस्थ बुधवारी पहाटे बंगळुरूकडे निघणार आहेत.

मंगळवेढा तालुका हा कायमचा दुष्काळी तालुका असून येथे पिण्याच्या पाण्यासोबत शेतीलाही कधी पाणी मिळत नव्हते. यासाठी गेले 50 वर्षे केवळ या गावांच्या पाण्यावर राजकारण होऊन अनेक आमदार खासदार निवडून आले पण या गावांचा घास कोरडाच राहिला.

यानंतर या गावांसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना बनविण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांची सही देखील झाली असली तरी अद्याप या योजनेस निधीची तरतूद झाली नसल्याने लोकसभा आचारसंहितेपूर्वी निधीची घोषणा करण्याची या गावांची मागणी होती.

निवडणूक प्रचारकाळ असो अथवा विधानसभा अधिवेशन असो, राज्यातील सर्वच नेत्यांनी या गावांना पाणी देण्याच्या घोषणा केल्या. मात्र या योजनेला निधी मिळू शकलेला नाही. उजनी धरणात असणाऱ्या अतिरिक्त 2 टीएमसी पाणी या गावांना उपसा करून देणारी ही योजना सध्या लालफितीत अडकल्याने याला निधीची घोषणा होऊ शकलेली नाही.

याउलट कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाचे पाणी मंगळवेढा तालुक्याच्या बॉर्डरवर आल्याने आम्हाला अलमट्टीच्या पाण्याची शाश्वती वाटते अशी भूमिका या गावांनी घेतली आहे. कर्नाटक सीमेपासून अगदी कमी अंतराचे कॅनॉल काढून या 24 गावांचा पाण्याचा प्रश्न हातोहात सुटू शकणार असल्याने या गावांनी आता जगण्यासाठी कर्नाटक बरे अशी ठाम भूमिका घेतली आहे.

गुरुवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या काय आश्वासन देतात त्यावर या 24 गावांचा निर्णय अवलंबून असणार आहे. बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी गेले अनेकवर्षे सीमावादावर बोलणारे मोठमोठे नेते आणि सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील या कायम दुष्काळी गावांचा प्रश्न सोडविण्याचा कधी प्रयत्न केला नाही.

आता या गावांचा संयम सुटला आणि महाराष्ट्र पाणी देणारच नसेल तर जगण्यासाठी कर्नाटकात जाऊ ही भूमिका घेऊन हे ग्रामस्थ कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.

अजूनही आचारसंहिता लागली नसली तरी राज्य सरकारने या योजनेस किमान निधी जाहीर केला तर या गावांचे कर्नाटकात सामील होणे थांबू शकणार आहे. अन्यथा ही राज्यातील शिंदे-भाजप सरकारवर मोठी नामुष्कीची वेळ ठरेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उजनी पाणी

संबंधित बातम्या

खुशखबर! श्रीराम सुपर मार्ट आजपासून मंगळवेढ्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; सर्व खरेदी आता एकाच छताखाली; खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू

पालकांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘श्रीराम सुपर मार्ट’मध्ये शालेय साहित्यावर २५% ते ६०% पर्यंत घसघशीत सूट; महागाईला ब्रेक, नव्या शैक्षणिक वर्षाची खरेदी होणार आता बजेटमध्ये

June 3, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 3, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट ‘गुन्हा’ दाखल केला; ​माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप

June 3, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
Next Post
सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या ‘चिमणी’वर आज हातोडा; पोलिसांचा मोठा बंदोबस्त; 200 हून अधिक सभासदांना घेतलं ताब्यात

शिंदे सरकारचा 21 कारखान्यांना थकहमी कर्ज देण्याचा प्रयत्न; मंगळवेढ्यातील 'या' कारखान्याला कर्ज मिळणार?

ताज्या बातम्या

खुशखबर! श्रीराम सुपर मार्ट आजपासून मंगळवेढ्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; सर्व खरेदी आता एकाच छताखाली; खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू

पालकांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘श्रीराम सुपर मार्ट’मध्ये शालेय साहित्यावर २५% ते ६०% पर्यंत घसघशीत सूट; महागाईला ब्रेक, नव्या शैक्षणिक वर्षाची खरेदी होणार आता बजेटमध्ये

June 3, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 3, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट ‘गुन्हा’ दाखल केला; ​माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप

June 3, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..