mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! अजय बारसकर यांना स्वतःच्या गावातूनच विरोध; गावकऱ्यांनी केला निषेध; मनोज जरांगेंना दिलं समर्थन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 27, 2024
in राज्य
सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक; उद्या मंगळवेढा बंदची हाक

टीम मंगळवेढा टाईम्स  

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्यावर मागील काही दिवसांपासून अजय महाराज बारसकर यांच्याकडून आरोप होत आहे.

सोमवारी देखील बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. असे असतानाच मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलणारे अजय बारसकर यांना त्यांच्याच गावातून विरोध होतांना पाहायला मिळत आहे.

अहमदनगरच्या सावेडी ग्रामस्थांच्या वतीने अजय बारसकर यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांचे कधीकाळचे सहकारी असलेल्या महाराज बारसकर यांनी अचानक जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतली.

मनोज जरांगे यांचे आंतरवाली आमरण उपोषण सुरु असतानाच बारसकर यांच्याकडून त्यांना पाणी पिण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, जरांगे यांनी बारसकरांना व्यासपीठाच्या खाली व्हा असे सांगून तेथून काढून दिले. त्यानंतर बारसकरांनी जरांगे यांच्याविरोधात भूमिका घेतली.

मागील काही दिवसांत सतत पत्रकार परिषदेतून त्यांनी जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. मात्र, जरांगे यांच्यावर आरोप करणाऱ्या बारसकरांना त्यांच्या मुळगाव सावेडी विरोध होतांना पाहायला मिळत आहे. बारसकरांनी जरांगे यांच्याविरोधात भूमिका घेतल्याने हा विरोध होत आहे.

गावकऱ्यांनी घेतला विरोधाचा ठराव…

अहमदनगर जिल्ह्यातील सावेडी हे अजय महाराज बारसकरांचे मूळ गाव आहे. मात्र, त्यांच्या याच मूळगावातून त्यांना विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्याची सावेडी येथील गावकऱ्यांनी भूमिका घेतली आहे.

गावकऱ्यांनी बारसकरांचा निषेध देखील केला आहे. तसेच, बारसकरांची भूमिका त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. त्यांच्या याच भूमिकेला सावेडी गावचा विरोध असल्याचा दावा देखील गावकरी करत आहेत. विशेष म्हणजे सावेडी येथील गावकऱ्यांनी ठराव घेत अजय महाराज बारसकरांचा निषेध केला आहे. सावेडीच्या विठ्ठल रुक्मणी मंदिरात हा ठराव घेण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा…

सावेडी येथील गावकऱ्यांनी ठराव घेत अजय महाराज बारसकरांचा निषेध असतानाच दुसरीकडे मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा देखील दिला आहे. मागील पाच ते सहा महिन्यापासून सुरु असलेल्या जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे.

आम्ही स्वतः त्यांच्या आंदोलनात सहभागी नसलो तरी आम्ही त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांच्या भूमिकेला देखील आमचे समर्थन असल्याचं गावकऱ्यांनी म्हटले आहेत. विशेष म्हणजे बारसकरांच्या भुमिकेशी सावेडी गावाचा कोणताही संबध नसल्याचे देखील गावकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मराठा आरक्षण लढा

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

अधिकाऱ्यांनो जनतेचे काम करा अन्यथा मलिदा खा...! मंगळवेढ्यात प्रहारचे अनोखे आंदोलन

ताज्या बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 10, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा