टीम मंगळवेढा टाईम्स।
प्रामाणिकपणे पत्रकारिता करून वंचित घटकाला न्याय देत दामाजी एक्सप्रेसने विश्वासार्हता जोपासली असे मत माजी आमदार राजन पाटील यांनी व्यक्त केले. ते दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या मोहोळ विभागीय कार्यालयाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे होते.
तर व्यासपीठावर शिवसेना उपनेते शरद कोळी,ज्येष्ठ नेते शहाजहान शेख,भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अंकुश अवताडे,पोलीस निरीक्षक बाबासो बेदरे,माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके,भाजपाचे बाळासाहेब पवार,विकास वाघमारे,
मोहोळ पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विष्णु शिंदे, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख संदीप शिंदे,हनुमंत कसबे,संपादक दिगंबर भगरे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सदरप्रसंगी राजन पाटील म्हणाले,दामाजी एक्सप्रेस वृत्तपत्र मोहोळ तालुक्यात सुरू होऊन आठ वर्षे झाली.समाजातील अनेक घटकांना न्याय मिळवून देणारे हे वृत्तपत्र आहे.अल्पावधीत हे वृत्तपत्र जिल्ह्यातील विविध भागात पोहोचले आहे श्र. वर्धापन दिनानिमित्त समाजामध्ये चांगले कार्य करणार्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शोध घेऊन त्यांना पुरस्कार देण्याची परंपरा चांगली आहे.
लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, पत्रकारिता सध्या अवघड झाली आहे. वृत्तपत्र चालवत असताना संपादकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दैनिक दामाजी एक्सप्रेस पेपर माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट, मोहोळ अशा प्रकारे जिल्ह्यातील सर्व भागात पोहोचला आहे. चांगला पेपर ,दणकेबाज पेपर म्हणून या वृत्तपत्राकडे पाहिले जाते.
विश्वकर्मा योजनेपासून ते आडम मास्तर यांनी मिळवलेल्या घरापर्यंत सर्व प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रात छापून येत असतात. बातम्यांचे पीठ चांगले मळले की,वृत्तपत्राच्या बातमीला पापुद्रा येतो.त्यांचा खमंग आस्वाद सर्वजण आवडीने घेतात.रामाच्या अयोध्येचे राम मंदिर व राम कांबळेचे घर बांधण्यापर्यंतची बातमी एकाच वृत्तपत्रात येत असते प्रसार माध्यमांना संगणकाची साथ मिळाली नसती तर पत्रकारिता आमच्या अवघड झाले असते लंडनची घटना शिरापूरच्या गावातला माणूस पेपरच्या माध्यमातून वाचत असतो.
घोडेश्वरच्या प्रेमाच्या चहाच्या टेबलावर दैनिक दामाजी एक्सप्रेसचा पेपर वाचायला मिळतो. कमी खर्चात प्रसारमाध्यमे महाग पेपर लोकांना वाचायला देतात. लोकशाहीचा चौथा खांब म्हणजे पत्रकार. वृत्तपत्र प्रतिष्ठा देतात. वृत्तपत्रे चालवणे जाहिरातीचा खर्च या सर्वांचा मेळ घालून वृत्तपत्र चालवावी लागते.
शरद कोळी म्हणाले, दैनिक दामाजी एक्सप्रेस हे वृत्तपत्र सर्वसामान्यांसाठी काम करणारे आहे या वृत्तपत्राने निर्भीडपणे माझ्या बातम्या लावल्या व मला या वृत्तपत्राच्या माध्यमातून वेळोवेळी न्याय मिळालेला आहे. दैनिक दामाजी एक्सप्रेस नेहमी अन्यायग्रस्त लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. सर्व टीम तळमळीने पेपर चालवत आहे.
यावेळी अंकुश आवताडे ,विकास वाघमारे आदींनीही आपली मनोगते व्यक्त केले.
यावेळी बेगमपूर येथील लक्ष्मण माने यांना जीवनगौरव, मोहोळ येथील अंजली काटकर यांना समाजरत्न,इंचगाव येथील मेजर डॉ. यशवंत डोके यांना शिक्षकरत्न,मोहोळ येथील साधना घाडगे यांना साहित्यरत्न, सोहाळे येथील मुकेश जगताप यांना कृषिरत्न, खंडोबाचीवाडी येथील साक्षी इंगळे हीच क्रीडारत्न,मोहोळ येथील अशोक पाचकुडवे यांना आदर्श पत्रकार,
मोहोळ येथील राकेश देशमाने यांना उद्योगरत्न, मोरवंची येथील प्रार्थना फाउंडेशनला आदर्श सामाजिक संस्था तर नरखेड येथील शहाजीराव पाटील विद्यालय आदर्श पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात सूरसंगम ग्रुपचे संतोष ढावरे व अजय सरवदे यांनी कराओके ट्रूॅकवर विविध गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी ज्ञानेश्वर भगरे, कैलास रणदिवे,नासीर मोमीन, संतोष मिसाळ, भीमराव पाटील,संतोष चव्हाण, संदेश सुरवसे, दीपक माने, कृषिभूषण रामचंद्र जगताप, हनुमंत कावळे, रशीद वळसंगकर, नवनाथ देशमुखे,राजू पाटील,डोके आदींसह मान्यवर व पत्रकार उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमासाठी साजिद हुंडेकरी,अनंत, आसिफ शेख, तेली, इरफान शेख, सुभानी आतार ,फैयाज मोजिज,शेख बेलीफ, जाफर शेख आदींनी परिश्रम घेतले. प्रास्तविक संतोष मिसाळ,सूत्रसंचालन प्रविण कोरे तर आभारप्रदर्शन नासिर मोमीन यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज