टीम मंगळवेढा टाईम्स
मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु केले आहेत.
त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे यानी 10 फेब्रुवारीपासून पाण्याचा गोठ देखील घेतला नसून, उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याचे पाहायला मिळत आहे.
सगेसोयरेबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी या मागणीवर जरांगे ठाम आहेत. दरम्यान, प्रशासनापुढे त्यांच्या खालावत चाललेल्या तब्येतीचा मोठं आव्हान उभं राहिलंय. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांत जरांगे यांच्या आंदोलनाची सरकारकडून कोणतेही दखल घेण्यात आलेली नाही.
मनोज जरांगे यांच्याकडून पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्यात येत असून, मागील चार दिवसांत त्यांनी अन्न, पाण्याचा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. तसेच, उपचार घेण्यास देखील त्यांनी नकार दिल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री आंतरवाली सराटीमध्ये जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल स्वतः पोहचल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.
तसेच, मनोज जरांगे यांना पाणी आणि उपचार घेण्याची विनंती केली. मात्र, सगेसोयरे कायद्याची जोपर्यंत अमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली. तसेच, उपोषण काळात पाणी देखील घेणार नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
सरकारकडून स्वतंत्र आरक्षण देण्याची हालचाली…
मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल 15 फेब्रुवारीला सरकारकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर 17 किंवा 18 तारेखला विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाच्या कायद्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मात्र. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण यावेळी दिला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी मात्र ओबीसीमधूनच आरक्षण हवे असल्याची मागणी केली आहे.
त्यासाठी सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी करण्याची मागणी जरांगे करत आहेत. त्यामुळे याबाबत आता मनोज जरांगे आणि सरकार यांच्यात काही तोडगा निघतो का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली…
सगेसोयरे अध्यादेशाच्या अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहेत. मात्र, मागील चार दिवसांपासून त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिला असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे.
तसेच जरांगे उपचार देखील घेत नाही. त्यामुळे आज चौथ्या दिवशी त्यांचे हात थरथरतांना पाहायला मिळत असून, त्यांना बोलणं देखील शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. तर, काल काही महिलांनी मनोज जरांगे यांना पाणी पिण्याची विनंती केली होती. मात्र, जरांगे यांनी त्यांना देखील पाणी पिण्यास नकार दिला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज