टीम मंगळवेढा टाईम्स ।
सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतीसाठी मोफत विविध उद्योजकता विकास व तांत्रिक प्रशिक्षण शिबिर आयोजिले आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवक युवतींनी ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित (लिडकॉम) पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सोलापूर आयोजित अनुसुचीत जाती चर्मकार समाजातील
सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी उद्योग व्यवसायाकडे वळावेत या दृष्टीकोनातून हे विशेष प्रशिक्षण आयोजिले आहे. अॅडव्हान्स ब्युटी पार्लर, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट प्रमोशन, उद्योजकता विकास प्रशिक्षण,
निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तांत्रिक विषयातील प्रात्यक्षिकासह व्यक्तीमत्व विकास मार्गदर्शन केले जाणार आहे.
संपर्क साधण्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे आवाहन
सर्व प्रशिक्षण कार्यक्रम मोफत असून प्रशिक्षण यशस्वी रित्या पूर्ण करणा-यास प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहिती साठी राम सुतार, कार्यक्रम आयोजक (९२२६१९६०५०) यांना किंवा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, किनारा हॉटेल समोर होटगी रोड, सोलापूर येथे संपर्क साधावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज