टीम मंगळवेढा टाईम्स।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताची गॅरंटी आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान मोदींचे आभार – केंद्रीय मंत्री
मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. अर्थसंकल्पात सर्व क्षेत्रांचा समावेश होता. आज आपण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपला देश जगात एक आत्मविश्वासपूर्ण देश बनला आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली.
अर्थसंकल्प समजून घ्या सोप्या शब्दांत (VIDEO)
निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण किती तासांचं?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अर्थसंकल्पीय भाषण संपलं. जवळपास एका तासाचं हे भाषण होतं. सरकारच्या या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. मात्र, या अर्थसंकल्पात गरीब, महिला वर्ग, शेतकरी, तरूण आदी घटकांवर अधिक भर दिल्याचं दिसून आलं.
करदात्यांना कोणताही दिलासा नाही, कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, पुढच्या ५ वर्षांत २ कोटी घरे उभारणार, अर्थसंकल्पातील पहिली मोठी घोषणा
PM kisan Yojana चा 38 लाख शेतकऱ्यांना फायदा
आयुषमान भारत योजना सर्व आशासेविकांना लागू, पुढची पाच वर्षे विकासाची असतील, नवीन मेडिकल कॉलेज उभारणार, ९ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झालाय, १ कोटी महिलांना लखपती दीदी केलं, लखपती दीदी योजनेतून आत्मनिर्भर केलं
आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना आयुषमान भारत योजना लागू, धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देणार, पर्यटन क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन
राज्यांना व्याजमुक्त कर्ज देणार
७५ हजार कोटींचे व्याजमुक्त कर्ज, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणार, ITR फाइल करण्याची सुविधा अत्यंत सोपी आणि सुलभ झाली, कर संकलनात तिपटीने वाढ झाली. गेल्या १० वर्षांत देशात सकारात्मक विकास – निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात झाली. भाषणाच्या सुरुवातीलाच विकासाचा मंत्र त्यांनी सांगितला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास वेगाने झाला आहे. गेल्या १० वर्षात सकारात्मक विकास झाला, असं त्या म्हणाल्या.
गरिबांचं कल्याण, गरजा आणि आशा- आकांक्षा यांना आमचं प्राधान्य, २५ कोटी लोकांसाठी विविध योजना राबवल्या., जनधन खात्यांमुळे ४.७ लाख कोटींची बचत झाली., सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचत आहेत., सबका साथ, सबका विकास यावर सरकार भर देत आहे.
ग्रामीण विकासाच्या योजना वेगाने लागू होत आहेत., घर, पाणी, वीज दिली जात आहे., ८० कोटी जनतेला मोफत रेशन, सर्वसमावेशक विकासावर सरकारचा भर, २०४७ पर्यंत आपला देश विकसित राष्ट्र असेल. आम्ही तीन तलाकसंबंधी कठोर कायदा आणला
१० वर्षांत महिला सक्षमीकरणावर सरकारचा भर, तरुणांना सशक्त बनवण्याचे प्रयत्न, ३ हजार नव्या आयटीआय सुरू केल्या, ५४ लाख तरुणांना प्रशिक्षित केलं, युवा क्षमता विकासासाठी सरकार कटिबद्ध
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज