टीम मंगळवेढा टाईम्स।
कर्नाटक राज्यातून मंगळवेढ्याकडे मोटर सायकलवर येणारा गुटखा बोराळे बीटच्या पोलीसांनी फिल्मी स्टाईलने १० ते १५ कि.मी.पाठलाग करुन पकडला.
दरम्यान मोटर सायकलसह ९१ हजाराचा गुटखा पोलीसांनी जप्त करुन अनिल सुभाष यादव (वय ३० वर्षे), नवनाथ शिवाजी मांडवे (वय २० वर्षे, रा. मारापूर) या दोघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, लोकसभा निवडणूक अनुषंघाने कात्राळ येथे नाकाबंदी नेमली होती. या दरम्यान दि.२१ रोजी दुपारी २ वाजता एम.एच.१३ डी.डब्ल्यू १९८८ या मोटर सायकलचा पोलीसांना संशय आल्याने त्याला इशारा केला
मात्र या इशाऱ्याकडे मोटर सायकलस्वारांनी साफ दुर्लक्ष करून पोलीसांना गुंगारा देत सुसाट वेगाने तशीच ती मोटर सायकल भालेवाडीच्या दिशेने निघाली.
यावर पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली बोराळे बीटचे पोलीस हवालदार महेश कोळी व हजरत पठाण यांनी तात्काळ त्या दोघा मोटर सायकलस्वारांचा जवळपास १० ते१५ किमी फिल्मीस्टाईलने जीवाची पर्वा न करता
पाठलाग करुन अखेर त्यांना भालेवाडी फाट्याजवळील शिवशरण यांच्या बंगल्याजवळ पकडले. यावेळी पोलीसांनी त्या दोघा आरोपीकडे मोटर सायकलवरील ठिक्यात काय आहे ? असे विचारले असता त्यांनी चडचणहून गुटखा आणल्याचे सांगितले.
सदर मोटर सायकल व गुटख्याचे ठिके जप्त करुन पोलीस स्टेशनला आणल्यानंतर तपासणी केल्यावर ७ हजार २०० रुपये किंमतीचे सुपर जीम पान मसल्याची ६० पॉकेट, ९०० रुपये किंमतीचे केशर मिश्रीत एस.पी.९९९ ६० पॉकेट, २ हजार ४०० रुपये किंमतीचे विमल पान मसाल्याची २० पॉकेट,
६०० रुपये किंमतीची व्ही १ तंबाखूची २० पॉकेट, ८० हजार रुपये किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटर सायकल असा एकूण ९१ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज