टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा परिषदेने सोमवारी शिक्षक भरतीची जाहिरात शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर अपलोड केली आहे.
त्यानुसार आता सोलापूर जिल्हा परिषदेला मराठी, इंग्रजी, कन्नड व उर्दू माध्यमाचे एकूण ४६८ शिक्षक मिळणार आहेत. फेब्रुवारीअखेर शिक्षक भरतीची प्रक्रिया संपविली जाणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा आहेत. साधारणतः सात वर्षांपासून शाळांमधील संपूर्ण रिक्त पदांची भरती न झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक कमीच होते.
आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ऐतिहासिक शिक्षक भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेने मराठी, उर्दू व कन्नड माध्यमांच्या शाळांमधील रिक्त पदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेतली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, महापालिकेचे प्रशासनाधिकारी संजय जावीर यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
‘कन्नड’ची बिंदुनामावली अल्पावधीत पूर्ण करून काही दिवसांत त्याची मान्यता मिळविली आणि शेवटच्या दिवशी जाहिरात ‘पवित्र’वर अपलोड केली हे विशेष. आता जानेवारी अखेर उमेदवारांना प्राधान्यक्रम भरून द्यावे लागतील.
प्राधान्यक्रमात उमेदवारांना किती जिल्हा परिषदांचा पर्याय द्यायचा याचे बंधन नाही. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल व संबंधितांना नेमणुका मिळतील. एकूण रिक्त पदांपैकी ७० टक्के पदे सध्या भरली जात आहेत.
माध्यमनिहाय शिक्षकांची भरती
■ माध्यम व शिक्षक
■ मराठी -३१२, इंग्रजी – ९१, कन्नड -२५, उर्दू – ४० ■ एकूण ४६८
जिल्हा परिषदेने मागितले ९१ इंग्रजी शिक्षक
सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरात १७९ केंद्र शाळा आहेत. त्याअंतर्गत आता प्रत्येक केंद्र शाळेसाठी स्वतंत्र इंग्रजी शिक्षक घ्यावा लागणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेकडे सध्या इंग्रजीचे ६९ शिक्षक आहेत.
त्यामुळे इंग्रजी विषयासाठी अजून ९१ शिक्षक मिळावेत, अशी मागणी पवित्र पोर्टलवर अपलोड केलेल्या जाहिरातीतून केली आहे. त्यामुळे मराठी माध्यमांचे ३१२ शिक्षक भरले जातील. शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून त्यात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप असणार नाही.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज