मोहोळ : देवानंद पासले
आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन उच्च पदाला गवसणी घालावी हे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. यासाठी ते अथक परिश्रम घेत असतात.
आई- वडिलांचे तेच स्वप्न बँकिंग क्षेत्रातील प्रोफेशनल ऑफिसर पदाला गवसणी घालून पूर्ण केल्याचा अभिमान असल्याची भावना ऐश्वर्या बोबडे हिने व्यक्त केली.
मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी येथील ऐश्वर्या विलास बोबडे हिने बँकिंग क्षेत्रातील आयबीपीएस या परीक्षेमध्ये यश संपादन करून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या प्रोबेशन ऑफिसर या पदाला गवसणी घातली आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण पासलेवाडी येथे, माध्यमिक शिक्षण अनगर व वैराग येथे, पदवी शिक्षण अकलूज येथे तर एम.एस.सी.ग्री. हे पदव्युत्तर शिक्षण कोल्हापूर येथे घेतले आहे.
ऐश्वर्याचे वडील विलास बोबडे हे शेतकरी असून शेतकरी कुटुंबातील मुलीने मोठ्या जिद्दीने अभ्यास करून या पदाला गवसणी घातल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तिच्या या निवडीबद्दल माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल तिचे चंद्रकांत गुंड, शहाजी गुंड, नारायण गुंड, तानाजी पासले, मनोज खपाले, राहुल पासले, दयानंद पासले, परमेश्वर पासले, शंकर पासले, सोमनाथ मोरे, संजय खपाले, महावीर बोबडे, दीपक शेळके, दिनकर पासले, विजयसिंह पासले, नानासाहेब पासले, अप्पासाहेब बोबडे, संजय खपाले यांनी अभिनंदन केले आहे.
मुलीने कष्टाचे चीज केले…
उच्च शिक्षण घेऊन मुलांनी उच्च पदाला गवसणी घालावी. यासारखा दूसरा कोणताही आनंद आई-वडिलांसाठी मोठा नाही. हाच आनंद ऐश्वर्याच्या यशामुळे मिळाला. तिने आमच्या कष्टाचे चीज केले. असे मत ऐश्वर्याचे वडील विलास बोबडे व आई इमाश्री बोबडे यांनी व्यक्त केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज