टीम मंगळवेढा टाईम्स।
यसोलापूर जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किंमतीची अपसंपदा आढळून आल्याने
किरण लोहार याच्यासह त्यांची पत्नी, मुलगा याच्यावर सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लाचलुपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी फिर्याद दिली आहे.
तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार (वय ५०), पत्नी सुजाता किरण लोहार (वय ४४), मुलगा निखिल किरण लोहार (वय २५, राहणार प्लॉट नं. सी.२, आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, लोहार यांनी परिक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक ५ कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयांची अपसंपदा जमविली आहे.
त्यांची पत्नी सुजाता लोहार व मुलगा निखिल लोहार यांनी किरण लोहार यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा व सहाय्य केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज