बाळासाहेब झिंजुरटे । पेटीएम अकाऊंट अपडेट करण्याच्या बहाण्याने नवी सांगोला शहरातील एका नागरिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या या टोळीने या नागरिकाला 87 हजाराला गंडा घातला आहे. याप्रकरणी सांगोला पोलिसांनी दोघा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच याची तपासणीही सुरु केली आहे. (Sangola Person Cheated through Paytm App)
माणिक बापू पवार (रा.नरेंद्रनगर, वासूद रोड, सांगोला यांना फोन आला तुमच्या पेटीएम अकाउंटची वैधता संपली आहे, असे सांगून एकाने प्ले स्टोअरवरून क्विक सपोर्ट ऍप डाउनलोड करावयास सांगितले अन् अकाउंटचा आयडी क्रमांक विचारून घेत खात्यातून परस्पर 87 हजार रुपये काढून घेतली आहे.
माणिक बापू पवार यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार 10 जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास 9405844746 या क्रमांकावरून फोन आला आणि फोनवरील व्यक्तीने, आपल्या पेटीएम अकाउंटची वैधता संपली असल्याचे सांगून प्ले स्टोअरवरून क्विक सपोर्ट हे ऍप डाउनलोड करण्यास सांगितले.
त्याप्रमाणे ऍप डाउनलोड केल्यानंतर पवार यांना आयडी क्रमांक विचारून घेतला व एक्झिट होण्यास सांगितले. त्यानंतर त्यांचे खाते असलेल्या लोकमंगल बॅंकचे खाते उघडण्यास सांगितले. बॅलन्स अपडेट करण्यासाठी त्यातील फंड ट्रान्सफर हा पर्याय निवडण्यास सांगून त्यांच्या खात्यात असलेले 87 हजार रुपये हडप केले.
एका खात्यावर 49 हजार, दुसऱ्या खात्यावर 28 हजार व तिसऱ्या खात्यावर 10 हजार असे परस्पर काढून घेतले. ही बाब लक्षात आल्यानंतर माणिक पवार यांनी सायबर पोलिस ठाणे, सोलापूर यांच्याकडे तक्रार दाखल केली. यावरून कोणकोणत्या खात्यावर किती रक्कम हस्तांतरित झाली याची माहिती उघड झाली आहे. याबाबत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खाते क्रमांक व मोबाईल क्रमांक असलेल्या राजकुमार यादव व पुतुल संत्रा या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राजेश गवळी तपास करीत आहेत.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज