टीम मंगळवेढा टाईम्स ।
नाशिक येथील रहिवासी कैलासवासी नामदेव श्रावण पाटील यांनी कामिनी एकादशीला पांडुरंगासाठी साडेदहा तोळ्याचा राजेवाडी हार अर्पण केला होता. आपण रुक्मिणी मातेसाठी काही केले नाही ही खंत त्यांच्या मनात होती.
त्यामुळे त्यांनी रुक्मिणी मातेसाठी सव्वा पाच तोळे वजन असलेला ३ लाख १२ हजार ६१० रुपये किमतीचा हार बनवण्यास दिला; परंतु दुर्दैवाने त्यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रुक्मिणी मातेला लक्ष्मी हार अर्पण करण्याचे त्यांचे स्वप्न, त्यांची इच्छा त्यांच्या पत्नी गीताबाई नामदेव पाटील, मुलगा सुनील नामदेव पाटील
व त्यांच्या कुटुंबीयांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पंढरपूरला येऊन त्यांची अंतिम इच्छा पूर्ण केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने पाटील कुटुंबाचा सन्मान करण्यात आला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज