टीम मंगळवेढा टाईम्स । सांगोला येथील कारागृहातील तब्बल १६ कैदी कोरोना चाचणीत पॉझिटीव्ह आल्याने पोलीस यंत्रणेसह प्रशासन खडबडून जागे झाले आहे तर सांगोला शहरात नव्याने ७ व तालुक्यातील बागलवाडी- १ , सोनलवाडी २ , बलवडी १ , संगेवाडी -१ असे एकुण एकाच दिवशी २८ रूग्ण वाढल्याने रुग्णांची संख्या ८७ वर पोहचली आहे. दरम्यान तालुक्यातील संगेवाडी बागलवाडी सोनलवाडी ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. Corona havoc in Sangola taluka continues on Wednesday with 28 corona positive on the same day
सांगोला तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवार दि.29 जुलै रोजी प्रथमच तालुक्यामध्ये 28 कोरोना बाधित रुग्ण सापडून उच्चांक गाठलेला दिसून येत आहे. त्यामुळे आजचा अखेर तालुक्यातील रुग्णांची संख्या 87 झालेली आहे. तर बरे होऊन घरी पाठवण्यात आलेल्यांची संख्या 12 आहे.तसेच कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्यांची संख्या 73 असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
तसेच सांगोला शहर व तालुका कोरोना या विषाणु संसंर्गजन्य आजाराची माहीती दि.29 जुलै रोजी 92 जणांचे स्वॅब कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले होते.
तसेच दि.29 जुलै रोजी 26 रॅपीड ॲन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या होत्या.वरील 26 रॅपीड ॲन्टीजन टेस्ट पैकी 06 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. सोलापूर येथे पाठविणेत स्वॅबचे 22 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.त्यामुळे आज अखेर एकुण सांगोला तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 87 वर गेलेली आहे.
आज अखेर उपचार कालावधीनंतर घरी सोडणेत आलेले रुग्ण संख्या 12 आहे.आज अखेर उपचार घेत असलेली रुग्ण संख्या 73 आहे. आज अखेर मयत रुग्ण संख्या 2 आहे. तसेच आज संगेवाडी,बागलवाडी,सोनलवाडी ही गावे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आलेली आहेत.
सांगोला तालुका हा दरम्यानच्या कालावधीमध्ये कोरोना मुक्त होण्यासाठी तालुक्यातील सर्वच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले होते.परंतु चालू परिस्थितीचा विचार करता.सांगोला शहरासह ग्रामीण भागातील गावांमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे प्रशासनाच्या कोरोनाविषयी निर्देशाचे तंतोतंत पालन नागरिकांनी स्वतः पासूनच करणे पुढील आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी सूचनांचे तंतोतंत पालन करून सांगोला तालुका कोरोना मुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज