mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राज्यातील ४२ तालुक्यांत दुष्काळाचे संकट, आज अहवालातून शिक्कामोर्तब होणार; सोलापूर जिल्ह्यात ‘या’ तालुक्यांचा समावेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 17, 2023
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।

यंदाच्या खरीप हंगामातील दुष्काळाचे मूल्यांकन महामदत प्रणालीमार्फत करण्यात आले आहे. यानुसार महाराष्ट्रातील ४२ तालुक्यांमध्ये ट्रिगर १ व २ लागू झाले आहे.

यातील काही गावांमध्ये ५० टक्के, तर काही गावांमध्ये ७५ टक्के कमी पाऊस पडल्याने ट्रिगर लागू झाले आहेत.

आता शेतीपिकांचे नुकसान झाल्याबाबत क्षेत्रीय सर्वेक्षण करून दुष्काळ मध्यम स्वरूपाचा आहे की गंभीर याबाबतचा उल्लेख करून १७ ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करा, असे निर्देश राज्याचे महसूल उपसचिव संजय धारूरकर यांनी दिले आहेत.

यानुसार सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून विविध नमुन्यांमध्ये माहिती मागवली आहे.

दरम्यान सोलापूर जिल्ह्यात करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला या तालुक्यांचा समावेश असल्याचे दिसत असले तरी मंगळवेढा तालुक्याचा समावेश करावा अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

यामुळे आज मंगळवारी राज्य शासनाकडे सादर होणाऱ्या अहवालातून नेमके काय वास्तव समोर येते व दुष्काळी मदत कधी मिळते याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

दुष्काळाचा टिगर लागू झालेल्या तालुक्यातील १० टक्के गावे रँडम पद्धतीने निवडून ७ ऑक्टोबर २०१७ व २८ जून २०१८ मधील सूचनानुसार क्षेत्रीय सर्वेक्षणाची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.

यात क्षेत्रीय सर्वेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र,नागपूर यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या महामदत या मोबाइल अॅपची मदत घेतली जात आहे. या अॅपद्वारे सर्वेक्षण पूर्ण करून दुष्काळी परिस्थिती आहे की किंवा कसे, असल्यास दुष्काळ मध्यम की गंभीर स्वरुपाचा आहे.

याबाबत उल्लेख करून जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडून विविध प्रपत्रातील अहवाल मागवण्यात आला आहे. या अहवालानुसारच शासनस्तरावरून दुष्काळ जाहीर करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

जिल्हानिहाय ट्रिगर १, २ लागू झालेले तालुके

सोलापूर : करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला,  छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर, सोयगाव

• जालना : जालना, भोकरदन, बदनापूर, अंबड, मंठा • बीड: वडवणी, धारूर, अंबाजोगाई – लातूर : रेणापूर धाराशिव वाशी, . धाराशिव, लोहारा जळगाव : चाळीसगाव बुलडाणा : बुलडाणा, लोणार : नाशिक : मालेगाव, सिन्नर, येवला पुणे : शिरूर, . घोडनदी, मुळशी पौंड, दौंड, पुरंदर सासवड, वेल्हा, बारामती, इंदापूर •  सातारा : वाई, खंडाळा कोल्हापूर : हातकणंगले, गडहिंग्लज • . सांगली : शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा, मिरज.

प्रमुख पाच पिकांचे करणार क्षेत्रीय सर्वेक्षण

क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी निवडलेल्या गावांमधील सोयाबीन, कापूससह प्रमुख पाच पिकांचे उत्पादन विचारात घेतले जाणार आहे बुधवारी सायंकाळपर्यंत सर्व माहिती शासनाला सादर केली लाईल. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना.(स्रोत:दिव्य मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दुष्काळ निवारण

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 10, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
Next Post
आता सुट्टी नाही! मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यत लढा सुरू ठेवणार; मनोज जरांगे पाटील यांची ग्वाही; मंगळवेढ्यातील सभेला प्रचंड गर्दी

पुढील आंदोलन सरकारला झेपणार नाही, पेलणार नाही; मराठा-धनगर एकत्र आले तर काय होईल? मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 10, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..