टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतात आल्याच्या कारणावरुन एका ३० वर्षीय महिलेस सात जणांनी एकत्र येवून शिवीगाळ करीत खुरप्याने व दगडाने मारुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी
श्रीशैल पांढरे, आण्णाप्पा पांढरे, सागर पांढरे, राकेश पांढरे, सचिन पांढरे, सुसला पांढरे, सुवर्णा पांढरे (सर्व रा.कात्राळ ता.मंगळवेढा) या सात जणाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी बयाना नंदकुमार पांढरे (वय ३०) यांचा व त्यांचे चुलत सासरे श्रीशैल पांढरे हे शेजारी शेजारी शेती असून शेतीच्या कारणावरुन मंगळवेढा न्यायालयात दिवाणी दावा दाखल आहे,
त्याचा निकाल अद्यापपर्यंत लागलेला नाही तेव्हापासून ते फिर्यादीवर चिडून आहेत. दि. ८ रोजी सायंकाळी ६ वाजता यातील फिर्यादी शेतातील गवत काढत असताना
वरील आरोपीने एकत्र येवून तुम्ही शेतात का आला असे म्हणून शिवीगाळ करु लागले. त्यावर फिर्यादीने शिवीगाळ करु नका ? असे म्हणताच आरोपीने त्यांच्या हातातील खुरप्याने
फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटावर मारले, तसेच दगड हातात घेवून पाठीवर मारुन जखमी केले. या दरम्यान फिर्यादीचे पती नंदकुमार, सासरे भानुदास हे घटनास्थळी पळत येवून भांडणे सोडवासोडवी केली.
सदर भांडणात फिर्यादीच्या गळ्यातील मणीमंगळसुत्र, कानातील फुले पडून गहाळ झाली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक उपचारासाठी त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज