टीम मंगळवेढा टाईम्स।
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या (राष्ट्रीय) विश्वगामी पत्रकार संघ संचलीत राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या कडून दिला जाणारा या वर्षीचा
“राज्यस्तरीय आदर्श महाविद्यालय पुरस्कार” मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल ला मिळाला आहे.
संपूर्ण इंग्रजी विषयीक माध्यमांचे वातावरण तयार करीत, विविध शैक्षणिक धोरणांसह अबॅकस, कराटे , ग्रेट व्यक्तींची भेट अंतर्गत परीचर्चा, परिसंवाद घडवणे, वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे, विविध कारखाने,
न्यायालय, ऑफिस, राष्ट्रीयकृत कार्यरत बँकांना भेट देऊन तेथील कार्याबद्दल विद्यार्थ्यांना ओळख करून देणे. खेळ,मनोरंजन,शास्त्रीय – उपशास्त्रीय संगीत याचे ज्ञान देणे.
या अन् अशा प्रकारच्या अनेक उपक्रमांना राबविणारी प्रशाला म्हणून नावलौकिक मिळवलेली शाळा म्हणजे उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल! यात भरीस भर म्हणून यावर्षी पासून ज्यूनियर कॉलेज ची शाखाही सुरू करण्यात आलेली आहे.
ही प्रशाला करीत असलेल्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशालेस भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघ संचलित, राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा.बापूसाहेब आडसूळ यांच्या संयोजनात या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर, (मुळे सभागृह) येथे पार पडलेल्या या सोहळ्यास पंढरपूरचे युवा उद्योजक अभिजित(आबा) पाटील,
डॉ.श्री.मनीष काळजे, माजी पालकमंत्री, श्री.लक्ष्मणराव ढोबळे सर, शिक्षणाधिकारी श्री.महारुद्र नाळे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष श्री.संतोष निकम यांच्यासह जिल्यातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
मंगळवेढा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथील स्त्रीरोग प्रसुती शास्त्र तज्ञ डॉ.पुष्पांजली शिंदे मॅडम व तालुका आरोग्याधिकारी डॉ.नंदकुमार शिंदे सर यांनीही स्कूल प्राचार्य सुधीर पवार यांच्या सह सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज